Crude Oil Import : मागील आर्थिक वर्षात भारताचा कच्च्या तेलाच्या खरेदीवरील खर्च वाढला आहे. भारताने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 119 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आणि इंधनाच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे हा खर्च वाढला असल्याचे म्हटले जात आहे. इंधन वापर आणि कच्च्या तेलाची आयात करण्यात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 


पेट्रोलियम मंत्रालयाच्या PPAC च्या आकडेवारीनुसार,  एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंतच्या काळात भारताने तेल आयातीवर 119.2 अब्ज डॉलर खर्च केले.  यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 62.2 अब्ज डॉलर इतका खर्च कच्च्या तेलाच्या आयातीवर करण्यात आला होता. 


मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या दराने मागील 14 वर्षातील उच्चांक गाठला होता. या मार्च महिन्यात भारताने कच्च्या तेलाच्या आयातीवर 13.7 अब्ज डॉलर खर्च केले. मागील वर्षाच्या तुलनेत या कालावधीत हा खर्च 8.4 अब्ज डॉलर इतका होता. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जानेवारीपासून वाढण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारीमध्ये 100 डॉलर प्रति बॅरल इतका खर्च झाला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किंमतीने 140 डॉलर प्रति बॅरल इतका उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर किंमती घसरू लागल्या होत्या.


PPAC च्या अहवालानुसार,  आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने 21.221 कोटी कच्च्या तेलाची आयात केली होती. तर, त्याहून मागील वर्षी 19.65 कोटी टन तेलाची आयात केली होती. कोरोना महासाथीच्या आधीचे वर्ष 2019-20 च्या तुलनेत ही संख्या कमी आहे. तर, 22.7 कोटी टन कच्चे तेल आयात करण्यात आले होते. त्यावेळी कच्च्या तेलाच्या आयातीवर 101.4 अब्ज डॉलर इतका खर्च झाला होता. भारत आपल्या मागणीच्या 85.5 टक्के कच्चे तेल आयात करतो.


इतर महत्त्वाच्या बातम्या: