Twitter-Elon Musk Deal: टेस्ला कंपनीचे सर्वोसर्वा आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेले एलन मस्क लवकरच सोशल मीडिया कंपनी ट्विटरचेही मालक होऊ शकतात. याबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एलन मस्क यांनी दिलेल्या 43 बिलियन डॉलर्सच्या ऑफरला ट्विटरच्या संचालक मंडळाकडून मंजूरी मिळू शकते. 


रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ट्विटरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मस्कच्या ऑफरवर गांभीर्याने विचार केला जात आहे. संचालक मंडळ ही ऑफर स्वीकारण्यास पूर्णपणे तयार असल्याचे आतापर्यंतचे संकेत आहेत. या बातम्यांदरम्यान, न्यूयॉर्कमधील ट्विटरच्या स्टॉकमध्ये प्री-मार्केट ट्रेडिंग दरम्यान 4.5 टक्क्यांनी वाढ झाली असून त्याची किंमत प्रति शेअर 51.15 डॉलर्सवर पोहोचली आहे.






ट्विटरच्या संचालक मंडळ ऑफर स्वीकारण्याची घोषणा करू शकते: सूत्र 


एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्ज डॉलर्स कॅश डील ऑफर केली आहे. ही त्यांची सर्वोत्तम आणि अंतिम ऑफर असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण डील जवळून जाणणाऱ्या सूत्रांच्या मते, ट्विटरचे संचालक मंडळ लवकरच जाहीर करू शकते की, मस्क यांची 54.20 प्रति डॉलर्स शेअर दराने केलेली ऑफर ते स्वीकारत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरचे संचालक मंडळ आपल्या शेअरहोल्डर्सना ही ऑफर स्वीकारण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. मात्र यासोबतच हा करार शेवटच्या क्षणी अयशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान एलन मस्क यांनी ट्वीट केलं आहे की, मला अशा आहे की, माझे टीकाकार अजूनही ट्विटरवर राहतील. कारण यालाच मुक्तपणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य म्हणतात.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: