IPO : आरोग्य सेवा पुरविणाऱ्या ग्लोबल लाँगलाइफ हॉस्पिटल अँड रिसर्चचा आयपीओ उद्या म्हणजे 21 एप्रिलला उघडणार आहे. गुजरातमधील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 49 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 25 एप्रिल पर्यंत गुंतवणूक करू शकतील.
या इश्यूसाठी 140 रुपये प्रति इक्विटी शेअरची किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि गुंतवणूकदार किमान 1000 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, म्हणजेच ते किमान 1.40 लाख रुपयांची बोली लावू शकतील. आयपीओच्या यशानंतर, शेअर्स सूचीबद्ध केले जातील आणि प्रवर्तकांची होल्डिंग 81.43% वरून 54.29% पर्यंत खाली येईल.
आयपीओबद्दल सर्व तपशील
- 49 कोटी रुपयांचा हा आयपीओ 21 ते 25 एप्रिल दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
- या इश्यू अंतर्गत, 10 रुपये दर्शनी मूल्याचे 35 लाख नवीन इक्विटी शेअर जारी केले जातील.
- याची किंमत 140 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे
- गुंतवणूकदार किमान 1000 शेअर्ससाठी बोली लावू शकतात, म्हणजेच ते किमान 1.40 लाख रुपयांची बोली लावू शकतील.
- इश्यूचा बोली आकार 33.24 लाख शेअर्स आहे.
- इश्यूच्या 50 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 50 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
- आयपीओच्या यशानंतर, शेअर्स BSE SME वर सूचीबद्ध केले जातील.
- इश्यूद्वारे जमा होणारा पैसा भाडेतत्त्वावर जमीन घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
- कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी याचा वापर होईल
कंपनीबद्दल ..
ग्लोबल लाँगलाइफ अँड रिसर्च लिमिटेड ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगात), नेत्र, हृदयरोग (हृदय), त्वचाविज्ञान (त्वचा), स्त्रीरोगतज्ञ (महिला), मणक्याची शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, अल्ट्रासाऊंड, मायक्रोबायोलॉजी, डायलिसिस आणि मानसोपचार यासह इतर आरोग्य सेवा प्रदान करते. कंपनीच्या आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाल्यास, 2018-19 या आर्थिक वर्षात त्यांचा निव्वळ नफा (करानंतरचा नफा) 136.47 लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये (-)86.24 लाख रुपये नकारात्मक क्षेत्रात आला. याचा अर्थ 2019-20 या आर्थिक वर्षात 86.24 लाख रुपयांचा तोटा झाला. पण पुढील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये परिस्थिती सुधारली आणि 103.54 लाख रुपयांचा नफा झाला. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्लोबल लाँगलाइफ हॉस्पिटल अँड रिसर्चने 386.31 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.