(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4,20,000 रुपयांची गुंतवणूक करा 65 लाख रुपये मिळवा, काय आहे योजना? कसा मिळेल लाभ?
SIP मध्ये गुंतवणूक करुन तुम्हा मोठा लाभ मिळवू शकता. 4,20,000 रुपयांच्या गुंतवणुक केल्यावर तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील. हे ऐकल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण या योजनेत असा परतावा मिळतो.
Investment Plan: अलिकडच्या काळा गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. सध्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देणाऱ्या विविध योजना आहेत. SIP मध्ये गुंतवणूक करुन तुम्हा मोठा लाभ मिळवू शकता. 4,20,000 रुपयांच्या गुंतवणुक केल्यावर तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील. हे ऐकल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण या योजनेत असा परतावा मिळतो.
SIP मध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. त्याचा सरासरी परतावा हा 12 टक्के मानला जातो. जो इतर कोणत्याही योजनेपेक्षा खूपच चांगला आहे. अशा परिस्थितीत, अगदी कमी रकमेची SIP करूनही तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जोडू शकता. SIP द्वारे तुम्ही जर 4,20,000 ची गुंतवणूक केली तर तुम्ही 65 लाख रुपये मिळवू शकता. तुम्हाला नेमका कसा लाभ मिळेल याबबातची सविस्तर माहिती पाहुयात.
4,20000 चे 65 लाख कसे होतील?
SIP द्वारे प्रचंड नफा मिळवण्यासाठी, तुम्हाला दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 1000 रुपयांची रक्कम इतकी कमी आहे की 10,000 रुपये किंवा 20,000 रुपये सामान्य पगार मिळवणारे देखील इतके पैसे सहज वाचवू शकतात. तुम्हाला ही गुंतवणूक 35 वर्षे सतत चालू ठेवावी लागेल म्हणजेच वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करा आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत चालू ठेवा. तुम्ही सलग 35 वर्षे म्युच्युअल फंडात SIP द्वारे दरमहा 1000 गुंतवल्यास, तुम्ही एकूण 420000 गुंतवाल. परंतू, 35 वर्षात 12 टक्के चक्रवाढ व्याज 60,75,269 रुपये असणार आहे. त्यामुळं 60 व्या वर्षी तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र करून 64,95,269 रुपये म्हणजे सुमारे 65 लाख रुपये मिळवू शकता.
कधी कधी दीर्घकाळात SIP चा परतावा 15 आणि 20 टक्केही असू शकतो
म्युच्युअल फंडात गुंतवणूक SIP द्वारे केली जाते, जी बाजाराशी जोडलेली असते, त्यामुळं ती जोखमीच्या अधीन असते. बाजारात परताव्याची हमी नाही. अशा परिस्थितीत एसआयपी म्युच्युअल फंडातही परताव्याची हमी देता येत नाही. बहुतेक आर्थिक तज्ञांचे असे मत आहे की दीर्घकाळात SIP चा सरासरी परतावा 12 टक्क्यांपर्यंत असू शकतो. कधी कधी असे दिसून आले आहे की 15 आणि 20 टक्के देखील उपलब्ध आहेत. इतका परतावा इतर कोणत्याही योजनेतून मिळत नाही. बाजारातील जोखीम असूनही, गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये लोकांची आवड लक्षणीयरीत्या वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या: