'या' बँका देतायेत सर्वात स्वस्त कर्ज, सविस्तर माहिती एका क्लिकवर
Interest Rate : तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती असणं गरजेचं आहे.
Interest Rate : अनेकवेळा लोकांना अचानक पैशाची गरज लागते. अशी अचानक पैशांची गरज भासल्यास वैयक्तिक कर्ज (Personal loan) हा सर्वात सोपा पर्याय आहे. तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती असणं गरजेचं आहे. बँका सहसा वैयक्तिक कर्जावर जास्त व्याज आकारतात. व्याजदर कधीकधी तुमचा क्रेडिट स्कोअर, बँकेशी असलेले संबंध आणि तुम्ही कुठे काम करता यावर अवलंबून असतो. चला जाणून घेऊया विविध बँकांचे व्याजदर किती?
ICICI बँक
देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक म्हणजे ICICI बँक. ही बँक वैयक्तिक कर्जावर 10.65 टक्के ते 16 टक्के वार्षिक व्याज आकारते. प्रक्रिया शुल्क म्हणून बँक 2.50 टक्के अधिक कर आकारते.
HDFC बँक
HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. वैयक्तिक कर्जावर बँकेकडून 10.5 ते 24 टक्के व्याज आकारले जाते. परंतू, बँकेकडून 4,999 रुपये निश्चित प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
SBI
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कॉर्पोरेट अर्जदारांकडून 12.30 ते 14.30 टक्के व्याज आकारते. सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना 11.30 ते 13.80 टक्के दराने व्याज आकारले जाते. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी, ते वार्षिक 11.15 ते 12.65 टक्के आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा सरकारी कर्मचाऱ्यांना 12.40 ते 16.75 टक्के वार्षिक दराने कर्ज देते. याशिवाय खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 15.15 ते 18.75 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळते.
PNB बँक
PNB बँक कर्जदारांना क्रेडिट स्कोअरवर अवलंबून 13.75 ते 17.25 टक्के दराने कर्ज देते. सरकारी कर्मचाऱ्यांना 12.75 टक्के ते 15.25 टक्के व्याजदर दिला जातो.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान 10.99 टक्के व्याज आकारते. तर कर्जाच्या फीवर प्रक्रिया शुल्क आणि कर जोडल्यानंतर ते सुमारे 3 टक्क्यांपर्यंत जाते.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जावर 10.65 टक्के ते 22 टक्के वार्षिक व्याजदर देते. इंडसइंड बँक वैयक्तिक कर्जासाठी वार्षिक 10.49 टक्के दराने कर्ज देते. 30 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर बँकेचे प्रक्रिया शुल्क 3 टक्के आहे.
जर तुम्ही पाच वर्षांसाठी कर्ज घेतले आणि व्याज दर 10.50 टक्के असेल तर तुम्हाला 2149 रुपये EMI भरावा लागेल. जर त्याच कालावधी आणि रकमेवर व्याजदर 12 टक्के असेल तर ईएमआय 2224 रुपये होईल. 15 टक्के व्याजावर EMI रुपये 2379 आहे. 1 7 टक्के व्याजाने EMI 2485 रुपये होते आणि 18 टक्के व्याजाने ते 2539 रुपये होते.