मुलीच्या लग्नात तब्बल 550 कोटींचा खर्च, आज मात्र 'हा' भारतीय उद्योगपती दिवाळखोर
देशातील एका उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नात मोठा खर्च केला होता, त्याचे आज दिवाळे निघाले आहे. या उद्योगपतीने मुलीच्या लग्नात 550 कोटी रुपयांचा खर्च केला होता.
Pramod Mittal : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या 2024 साली झालेल्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली कारण त्यांनी त्या लग्नात मोठा खर्त केला होता. हा खर्च पाहून लोक हैराण झाले होते. पण, तुम्हाला माहिती आहे का की या लग्नाच्या 10 वर्षांपूर्वी देशात एक भव्य विवाह झाला होता, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. मात्र, ज्या उद्योगपतीने आपल्या मुलीच्या लग्नात मोठा खर्च केला होता, त्याचे आज दिवाळे निघाले आहे. प्रमोद मित्तल असं या उद्योगपतीचे नाव आहे. एक काळ असा होता जेव्हा त्यांचे नाव देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत होते, परंतु 2020 मध्ये प्रमोद मित्तल दिवाळखोर झाले.
प्रमोद मित्तल हे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आहेत. एक काळ असा होता जेव्हा त्यांचे नाव देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत होते. परंतु 2020 मध्ये प्रमोद मित्तल दिवाळखोर झाले. 2020 मध्येच लंडन कोर्टाने प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केले होते. त्यावेळी त्यांच्यावर 13 कोटी पौंडपेक्षा जास्त कर्ज होते.
मुलीच्या लग्नात 550 कोटी खर्च
मुकेश अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नात पैशाची पर्वा केली नाही, त्याचप्रमाणे प्रमोद मित्तल यांनी देखील 2013 मध्ये त्यांची मुलगी सृष्टीचं लग्नात पैशाची पर्वा केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये प्रमोद मित्तल यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नावर अंदाजे 550 कोटी रुपये खर्च केले होते. प्रमोद मित्तल यांनी बोस्नियन कोक कंपनी GIKIL च्या कर्जाची हमी घेतली होती. पण, GIKIL ला त्याचे कर्ज फेडता आले नाही. आता प्रमोद मित्तल याचे जामीनदार असल्याने त्याचा परिणाम त्यांच्यावरही झाला. GIKIL ने लंडनमधील स्टील ट्रेडिंग कंपनीकडून कर्ज घेतले होते. GIKIL ने या कंपनीच्या कर्जाची परतफेड केली नाही तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचले. या संपूर्ण प्रकरणात प्रमोद मित्तल यांनाही गोवण्यात आले आणि त्यानंतर 2020 मध्ये प्रमोद मित्तल यांना न्यायालयाने दिवाळखोर घोषित केले. याआधी 2019 मध्ये त्याला बोस्नियामध्येही फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
नोटबंदीच्या वेळी प्रमोद मित्तल 68 वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कर्जदारांना सुमारे 24,000 कोटी रुपये दिले होते. त्यांनी दिवाळखोरी दाखल करताना सांगितले की त्यांचे कोणतेही वैयक्तिक उत्पन्न नाही. दिल्लीत त्यांच्या नावावर फक्त 45 पौंडांची मालमत्ता होती. 2019 मध्ये, प्रमोद मित्तल यांना त्यांच्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह बोस्नियामध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. भारतातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (STC) सह कथित 2,200 कोटी रुपयांच्या फसवणुकीमध्ये मनी लाँड्रिंगसाठी त्याची चौकशी केली होती.