कुटुंबासोबत किती वेळ घातलवता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही आनंदी किती असता हे महत्वाचं : गौतम अदानी
अदानी समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी वर्क लाईफ बॅलन्सबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
![कुटुंबासोबत किती वेळ घातलवता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही आनंदी किती असता हे महत्वाचं : गौतम अदानी Industrialist Gautam Adani statement on work life balance happy life family कुटुंबासोबत किती वेळ घातलवता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही आनंदी किती असता हे महत्वाचं : गौतम अदानी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/10/04143746/10-gautam-adani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautam Adani : अदानी समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी वर्क लाईफ बॅलन्सबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. वर्क लाईफ बॅलन्स समजावून सांगताना गौतम अदानी म्हणाले की, तुम्हाला जे काम आवडते ते तुम्ही केले तर तुमचे वर्क लाईफ चांगले राहते. तुम्ही कुटुंबासोबत किती वेळ घातलवता हे महत्वाचं नसून त्यावेळी तुम्ही किती आनंदी असता हे महत्वाचं असल्याचे गौतम अदानी म्हणाले.
नेमकं गौतम अदानी काय म्हणाले?
मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान वर्क लाईफ बॅलन्सबद्दल गौतम अदानी बोलत होते. कुटंब असो की नोकरी दोघांशिवाय जीवन नाही असे अदानी म्हणाले. काही लोक कुटुंबासोबत 4 तास घालवतात तर काही लोक 78 तास घालवतात. पण तुम्ही कुटुंबासोबत किती वेळ घातलवता हे महत्वाचं नसून त्यावेळी तुम्ही किती आनंदी असता हे महत्वाचं असल्याचे गौतम अदानी म्हणाले. कारण तुमच्या कुटुंबातील मुलं या गोष्टी पाहतात आणि मग तेच शिकतात. त्यामुळं या गोष्टी ज्याला जमल्या त्याचे वर्क लाईफ बॅलन्स उत्तम असल्याचे गौतम अदानी म्हणाले.
मी दररोज 4 तास माझ्या कुटुंबासोबत घालवतो
यावेळी बोलताना गौतम अदानी म्हणाले की, मी दररोज 4 तास माझ्या कुटुंबासोबत घालवतो, मी त्याचा आनंद घेत आहे असे गौतम अदानी म्हणाले. तुम्हाला आनंद मिळेल आणि इतरही आनंदी राहतील अशा प्रकारे तुम्ही समन्वय ठेवा असे गौतम अदानी म्हणाले. मला जे काम आवडते ते मी करतो आणि माझे काम जीवन संतुलित आहे. पण मी माझे कामाचे आयुष्य इतर कोणावरही लादू शकत नाही. त्याच वेळी, इतर कोणीही माझ्यावर त्यांचे कार्य जीवन संतुलन लादू शकत नाही. असे केले तरच कामाचे आयुष्य संतुलन राखले जाईल. लोकांनी कुटुंबासह कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही गौतम अदानी म्हणाले.
शेअर बाजारात आज अदानीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ
दरम्यान, शेअर बाजारात आज अदानीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (अदानी पोर्ट्स स्टॉक्स) 5.22 टक्क्यांनी वाढून 1243.95 रुपयांवर बंद झाले आहे. अदानी ग्रीन एनर्जी - 3.57 टक्क्यांनी वाढून 1067.85 रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्स - 2.49 टक्क्यांनी वाढून 790.50 रुपये, अदानी पॉवर - 2.22 टक्क्यांनी वाढून 507 रुपये, अदानी एंटरप्रायझेस - 1.36 टक्क्यांनी वाढून 2404.70 रुपये आणि अदानी विल्मार 2.8 टक्क्यांनी वाढले. वर चढून 319.55 रुपयांवर बंद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)