एक्स्प्लोर

रुपयाने गाठला ऐतिहासिक निचांकी दर; डॉलर आणखी वधारला

Rupee at All time Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी घसरला असून आज निचांकी नोंद केली.

Rupee at All time Low:  भारतीय चलन रुपयामध्ये सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्ह दिसत नाही. रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक निचांकी दर गाठला आहे. रुपयाचा दर प्रति डॉलर 77.59 रुपये इतका झाला आहे. बाजार सुरू झाल्यानंतर रुपया 77.50 रुपये या दरावर उघडला गेला. त्यानंतर त्यात आणखी घसरण झाली. रुपयाने सोमवारी 9 मे रोजी 77.41 पैसे हा दर गाठला होता. रिझर्व्ह बँकेने 4 मे रोजी रेपो दरात वाढ केली होती. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. त्यानंतर शेअर बाजारात आणि रुपयांमध्ये आणखी घसरण सुरू झाली. 

आज भारतीय रुपयात 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. बुधवारी रुपया 77.24 रुपये प्रति डॉलर या दरावर बंद झाला होता. त्यानंतर आज सकाळी थेट 26 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. 

डॉलर का वधारला?

अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये ही महागाईने 8.3 टक्के इतका दर गाठला. महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या परिणामी डॉलरचा दर आणखी वधारला आहे. याचा परिणाम जागतिक चलन बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यात अमेरिकेत 8.5 टक्के इतक्या महागाईची नोंद करण्यात आली. तर, एप्रिलमध्ये महागाईचा दर 8.3 टक्के इतका राहिला. हा दरदेखील मागील 40 वर्षातील उच्चांकी दर आहे. 

अमेरिकेतील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून आगामी बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची अटकळ बांधली जात आहे. त्याच्या परिणामी डॉलरची किंमत आणखी वधारू शकते. 

रुपयाचा दर घसरल्याने काय परिणाम होणार?

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर घसरल्याने भारताचा आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलासह इतर महत्त्वाच्या वस्तूंची आयात करणे आणखी महाग होणार आहे. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी आटण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे.  

पाहा व्हिडिओ: Rupee Value Fall Explained : रुपयाच्या किंमतीत घसरण का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Embed widget