एक्स्प्लोर

Diesel Tax Update : डिझेलवरी टॅक्स दुप्पट, हवाई इंधनावरील टॅक्सही वाढवला; सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Diesel Windfall Tax : केंद्र सरकारनं डिझेल आणि ATF च्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढवला असून याचा इंधन दरांवर आणि पुरवठ्यावर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : इराण युद्ध आणि होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या निर्यातीवरील टॅक्स दुप्पटीपेक्षा जास्त वाढवला आहे. या निर्णयामागे देशातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवणं आणि रिफायनरी कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यावर नियंत्रण ठेवणं हा उद्देश असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिझेलवरील एक्सपोर्ट ड्युटी 21.5 रुपये प्रति लिटरवरून थेट 55.5 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ATF वरचा टॅक्स 29.5 वरून 42 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. मात्र पेट्रोलवरील एक्सपोर्ट ड्युटी शून्यच ठेवण्यात आली आहे.

Diesel Export Tax Hike : डिझेलवरील करात मोठी वाढ

सरकारच्या या निर्णयामुळे तेल कंपन्यांना डिझेल निर्यात करणं महाग होणार आहे. परिणामी कंपन्या देशांतर्गत बाजारात अधिक इंधन उपलब्ध करून देतील, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे देशात डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

ATF Tax Impact : विमान इंधनावरही परिणाम

ATF वरही मोठ्या प्रमाणात कर वाढवण्यात आल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत हा ATF चा मोठा निर्यातदार देश असल्यामुळे या निर्णयाचा परिणाम एअरलाईन्स आणि रिफायनरी दोघांवरही होणार आहे.

Petrol Tax Status : पेट्रोलवर मात्र बदल नाही

सरकारनं पेट्रोलवरील एक्सपोर्ट ड्युटीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलवर सध्या शून्य कर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार नाही.

Windfall Tax Return : पुन्हा लागू केला विंडफॉल टॅक्स

सरकारनं याआधी डिसेंबर 2024 मध्ये विंडफॉल टॅक्स हटवला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या जागतिक तणाव आणि तेल कंपन्यांच्या वाढत्या नफ्याच्या पार्श्वभूमीवर हा कर पुन्हा लागू करण्यात आला आहे.

Fuel Price Impact : सर्वसामान्यांवर काय परिणाम?

सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत इंधन पुरवठा वाढण्याची शक्यता असून डिझेल दर वाढण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. त्यामुळे थेट दरवाढ टळण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

What Is Windfall Tax : विंडफॉल टॅक्स का आकारला जातो?

जुलै 2022 मध्ये भारतात प्रथमच विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला आणि पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल देशाबाहेर विकून कमावलेला नफा वसूल करण्यासाठी कच्च्या तेल उत्पादकांवर तो लागू करण्यात आला. खासगी रिफायनरी या पेट्रोलियम पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून अधिक नफा कमवत होत्या आणि ते कमी करण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेऐवजी तेल उत्पादनं तिथेच विकण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावर बंधनं लावण्यासाठी सरकारनं हा विंडफॉल टॅक्स आकारण्यास सुरुवात केली. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget