एक्स्प्लोर

सर्वसामान्यांना दिलासा! महागाई कमी, किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात 7.04 टक्के

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती.

मुंबई : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्वस्त खाद्यपदार्थांमुळे मे 2022 मध्ये किरकोळ महागाई कमी झाली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्क्यांवर होता, तर एप्रिलमध्ये 7.79 टक्के होता. आरबीआयचं पतधोरण आणि सरकारे इंधनाच्या दरामध्ये केलेली कपात याचा परिणाम महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो आहे असं जाणकारांचे मत आहे. 

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती. एप्रिलमधील 8.31 टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात अन्नधान्य महागाई दर 7.79 टक्के होता.

आरबीआयचा अंदाज, 2022-23 मध्ये किरकोळ महागाई 6.7%

या महिन्यात पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून 6.7  टक्क्यांवर नेला आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना केंद्रीय बँक प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार केला होता.

रेपो दर 36 दिवसांत दोनदा वाढला

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने महिन्याभरात व्याजदरात सुमारे 1 टक्क्यांनी वाढ केली आहे. खरं तर, 8 जून 2022 रोजी, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली आणि तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी मध्यवर्ती बँकेने रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी वाढवून 40 बेस पॉईंट्स केला होता.

दोन टक्क्यांच्या तफावतीने चलनवाढ चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँकेला दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात पतधोरण आणि राजकीय निर्णय कशापद्धतीने घेतले जातात आणि महागाई कशापद्धतीने आवाक्यात ठेवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget