एक्स्प्लोर

तांदळाच्या दरात वाढ, सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा; किंमत कमी करण्यासाठी नवा प्लॅन काय?  

तांदळाच्या दरात (Rice Price) वाढ होत आहे. वाढत्या किंमती कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रतत्न करत आहे. कारण, सरकारला महागाई नियंत्रणात ठेवायची आहे.

Bharat Rice: तांदळाच्या दरात (Rice Price) वाढ होत आहे. वाढत्या किंमती कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रतत्न करत आहे. कारण, सरकारला महागाई नियंत्रणात ठेवायची आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, वाढत्या तांदळाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार आता सर्वसामान्यांना 29 रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री करणार आहे. त्यासाठी सरकारनं भारत राईस (Bharat Rice) नावानं नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये तांदूळ पॅक

वाढते अन्नधान्याचे दर कमी करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. अन्नधान्याच्या महागाईत तीव्र वाढ झाल्यानंतर, सरकारनं आधीच भारत ब्रँड नावाने डाळी आणि पीठ बाजारात आणले आहे. अशातच आता भारत राईस नावाने सरकारनं तांदूळ बाजारत आणला आहे. 29 रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री केली जात आहे. दरम्यान, मोदी सरकारनं भारतात 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये तांदूळ पॅक केला आहे. 

तांदळाच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ

दरम्यान, किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ झाल्यानं लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं भारत डाळ आणि भारत आटानंतर भारत तांदूळ बाजारात आणला आहे. गेल्या वर्षभरात तांदळाच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तांदळाच्या भाववाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने किरकोळ बाजारात 29 रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने भारत तांदूळ बाजारात आणला आहे.

 परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील :   पियुष गोयल 

दैनंदिन खाद्यपदार्थ सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा लोकांना फायदा होऊ शकला नाही, म्हणून सरकारनं किंमत स्थिरता निधी अंतर्गत किरकोळ हस्तक्षेप सुरु केला आहे. किरकोळ हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून, मध्यमवर्गीय ग्राहक आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ 29 रुपये प्रति किलो दराने विकला जाईल असे गोयल म्हणाले.

मंत्री गोयल यांनी दाखवला 100 मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा 

मंत्री पियुष गोयल यांनी 100 मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. ज्या माध्यमातून 'भारत तांदूळ' विकला जाणार आहे. तसेच पाच लाभार्थ्यांना पाच किलो पॅकचे वाटपही मंत्री गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या टप्प्यात, एफसीआय नाफेड आणि एनसीसीएफसह केंद्रीय राखीव निधीसाठी पाच लाख टन तांदूळ प्रदान करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही तांदूळ विकला जाईल.

चणा डाळ 60 रुपये किलो दरानं उपलब्ध

अन्नधान्याच्या महागाईत मोठी वाढ झाल्यानंतर सरकारनं भारत ब्रँडच्या नावाखाली डाळी आणि पीठ बाजारात आणले आहे. डाळींच्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात भारत ब्रँडच्या नावाखाली चणा डाळ 60 रुपये किलो दराने विकली जात आहे. गव्हाचे भाव वाढलेले असताना सर्वसामान्यांना स्वस्त दरात पीठ मिळावे म्हणून सरकार 27.50 रुपये किलोने पीठ विकत आहे. आता सरकारने भारत राईस लाँच केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 शेतकऱ्यांकडून 600 लाख टनांहून अधिक तांदळाची खरेदी, दर कमी करण्यासाठी सरकार उचलणार हे पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Russia-Ukraine war : युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळ अखेर बोलले, पहिला वार थेट अजितदादांवर!Beed Sarpanch Death CCTV : बीड सरपंच हत्येचा नवा व्हिडीओ, संतोषचा भाऊ, आरोपी आणि PSIची भेटABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 December 2024Uddhav Thackeray Meet Rahul Narvekar : फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे राहुल नार्वकरांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Russia-Ukraine war : युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
युक्रेन हल्ल्यात रशियाचे अण्वस्त्र प्रमुख ठार; इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 300 ग्रॅम टीएनटी पेरून हत्या! चार महिन्यात तीन रशियन अधिकाऱ्यांच्या हत्या
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब; अर्ज भरणार
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Beed Santosh Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! PSI आणि आरोपीच्या भेटीचा CCTV
Santosh Deshmukh VIDEO : आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का? 
Rapper Badshah : अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुननंतर आता रॅपर बादशाह सुद्धा पोलिस कारवाईत अडकला! नेमकं प्रकरण काय?
Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!
IPO Listing: दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
दोन आयपीओच्या लिस्टिंगनं स्टॉक मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स कोसळत असताना गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
Embed widget