एक्स्प्लोर

Income Tax Raid : 50 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, वायर कंपनीला 'शॉक'; शेअर दरात घसरण

Income Tax Raid On Polycab India : आयकर विभागाने आज पॉलीकॅब इंडिया या कंपनीशी संबंधित 50 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर दरावरही दिसून आला.

Income Tax Raid :  आयकर विभागाने (Income Tax) आज केलेल्या कारवाईचा परिणाम कंपनीच्या शेअर दरावरही (Share Price) झाला. आज आयकर विभागाने 'पॉलीकॅब इंडिया'शी (Polycab India) संबंधित 50 हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. मुंबईत कंपनीशी संबंधित ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान, कार्यालये यांचाही समावेश आहे. आयकर विभागाच्या कारवाईने पॉलीकॅब इंडियाच्या शेअर दरात घसरण झाली आहे. 

पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज 4 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. आज दिवसखेर कंपनीचा शेअर 5,362.85 रुपयांवर बंद झाला. गेल्या 15 दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. या छाप्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होताना दिसत आहे. पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी वायर आणि केबल उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय देशभर पसरलेला आहे. 

आयकर विभागाची कारवाई का?

आयकर विभाग पॉलीकॅब इंडियाच्या 50 हून अधिक ठिकाणांवर कर चुकवेगिरीच्या प्रकरणात छापेमारी करत आहे. फर्मच्या उच्च व्यवस्थापनाच्या निवासस्थानांची आणि कार्यालयांचीही झडती घेतली जात आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सकाळी पॉलीकॅबचा शेअर 5.04 टक्क्यांनी घसरून 5,335 रुपयांवर व्यवहार करत होता. BSE वर शेअर 5,404 रुपयांवर आला. कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. या वर्षी तिच्या शेअर्सची किंमत दुप्पट झाली होती.

कंपनीला झाला होता नफा

सप्टेंबरमध्ये कंपनीने चांगलाच नफा नोंदविला होता. 11 डिसेंबर रोजी पॉलीकॅब इंडियाचे बाजार भांडवल सुमारे 85 कोटी रुपयांवर पोहोचले होते. मार्केट कॅपच्या बाबतीत कंपनीने हॅवेल्स इंडियाला मागे टाकले. पॉलीकॅब इंडिया इतर इलेक्ट्रिकल वस्तूंव्यतिरिक्त वायर आणि केबल्सचे उत्पादन आणि विक्री करते. देशभरात 23 उत्पादन सुविधा, 15 कार्यालये आणि 25 पेक्षा जास्त गोदामांसह पसरलेले आहे. कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी 436.89 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा जाहीर केला होता.

(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget