Pawan Munjal: हिरो मोटोकॉर्पचे (Hero Motors Company) अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभाग आज छापे टाकत आहे. पवन मुंजाल यांच्याशिवाय त्यांच्या कंपनीच्या इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. हे छापे करचुकवेगिरीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत. देशातील जवळपास 36 ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.


36 ठिकाणांवर छापेमारी  


आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कॉर्प ग्रुपवर छापे टाकले असून सुमारे 36 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद पंजाबमध्ये ही छापेमारी सुरू.


हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या हरयाणामधील (Haryana) गुडगाव येथील निवासस्थानावर आणि कार्यालयावरही आयकर विभाग छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाचे पथक पवन मुंजालशी संबंधित अनेक ठिकाणी शोध घेत आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात येत असून या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिरो कॉर्प मुंजाल ब्रदर्सचे आहे. तर एअर चार्टर मनिंदर सिंग सेठी यांच्या मालकीचे आहे.


आज सकाळी 11.25 वाजता Hero MotoCorp चे शेअर्स1.25 टक्क्यांनी घसरल्यानंतर 2393 रुपये प्रति शेअरवर ट्रेंड करत होते. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची बातमी येताच याच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली होती. जी आता 1 तासानंतर थोडी सावरली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: