Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1 हजार 778 नवीन रुग्ण आढळले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1 हजार 581 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आणि 33 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 12 हजार 749 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 23 हजार 87 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 2 हजार 542 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 605 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 73 हजार 57 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 30 लाख 53 हजार 897 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत लसीचे 181 कोटी 89 लाख 15 हजार 234 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील लोकांना दोन कोटींहून अधिक (2 कोटी 20 लाख 10 हजार 777) प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Hyderabad Fire : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 11 मजूरांचा मृत्यू, 12 जण अडकल्याची भीती
- Petrol Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ, पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागलं
- Viral Video : चहाप्रेमींनो 'हा' 'फ्रुट टी' प्यायलात का? सुरतमध्ये मिळतोय सफरचंद, केळी आणि चिकूचा चहा; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha