Price Hike : मार्च महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे महागाईचे चटके सामान्यांना सहन करावे लागत आहेत. या महिन्यात इंधनांसह सहा वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे आता महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे आता उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चातही वाढ होणार आहे.
>> मार्च महिन्यात दरवाढ झालेल्या वस्तू:
गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
देशात घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.
पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ
जवळपास चार महिन्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. मंगळवारी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मंगळवारी प्रति लीटर 84 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची दरवाढ झाली. बुधवारीदेखील इंधन दरात वाढ झाली.
घाऊक डिझेलच्या दरात वाढ
घाऊक डिझेलच्या दरात इंधन कंपन्यांनी घाऊक ग्राहकांसाठीच्या इंधन दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घाऊक डिझेल ग्राहकांनी पेट्रोल पंपामधून इंधन भरण्यास सुरुवात केली आहे.
दूध दरात वाढ
वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ, कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.
मॅगीच्या दरात वाढ
12 रुपयांना मिळणारे 70 ग्रॅमचं मॅगी मसला नूडल्सचे (Maggi Masala noodles) पाकिट आता 14 रुपयांना झाले आहे. मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पाकिटाची किंमतीमध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे. तर 140 ग्रामच्या पाकिटाची किंमतीत तीन रुपयांनी महाग झाली आहे. 560 ग्रॅमच्या पाकिटाची किंमतीत 9.4 टक्केंनी वाढ झाली आहे. 96 रुपयांना मिळणारे मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे.
कॉफीच्या किंमतीत वाढ
कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती. नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे.