Novavax Corona Vaccine Get Approval : सध्या देशात कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. यामध्ये लसीकरणाचा मोठा परिणाम असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. अशातच कोरोना विरोधातील लढाईत आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला 12 ते 17 वर्षे वयोगटातील व्यक्तींवर आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नोव्हावॅक्स यांनी माहिती दिली. दरम्यान, भारतात सध्या प्रौढ व्यक्तींनंतर आता पौगंडावस्थेतील आणि लहान मुलांच्या कोरोना लसीकरणावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. 


नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 या नावानं देखील ओळखली जाते. भारतात याचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. भारतातील पहिल्या प्रथिन आधारित लसीला कोवोवॅक्स असं नाव देण्यात आलं आहे. या मंजुरीनंतर नोव्हावॅक्स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ स्टॅनले सी. एर्क आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनीही आनंद व्यक्त केला आहे. पौगंडावस्थेतील मुलांसाठी या प्रोटीन आधारित लसीला मंजुरी मिळाल्याचा अभिमान असल्याचं दोघांनीही सांगितले आहे.


किशोर वयातील मुलांसाठी चौथी लस


Covovax पूर्वी, देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी तीन लसींना मंजूरी देण्यात आली आहे. सध्या देशात या वयोगटात जैविक E's Corbevax, Zydus Cadila's ZyCoV-D आणि Bharat Viotek's Covaccine यांचा वापर केला जात आहे. आता कोवोव्हॅक्सही या यादीत सामील झालं आहे.


ही लस किती प्रभावी?


नोव्हावॅक्सनं फेब्रुवारीमध्ये सांगितलं की, त्यांची लस 80 टक्के प्रभावी आहे. भारतात, 12 ते 17 वर्षे वयोगटातील 2,247 मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'कोव्हॉवॅक्स'ला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी मान्यता मिळाली होती. अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेनंही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :