Investment Option : गेल्या आठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ग्राहक किंमत महागाईचा निर्देशांक (CPI) 7.79% इतका आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण जाहीर झालं. यामध्ये रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धामुळे भारतासह संपूर्ण जगात महागाई वेगाने वाढत  असल्याचं RBI ने स्पष्ट केलं आहे. तसेच महागाईतील देशातील स्थिती जाहीर केली. त्यामध्ये ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे तो गेल्या आठ वर्षांत सगळ्यात जास्त यावर्षी असल्याचं जाहीर केलं. 


महागाई वाढली की तुमची सेविंग कमी राहते. तुम्हाला गुंतवणूक करता येत नाही. तसेच गुंतवणूक केलीच तर ती कमी प्रमाणात होते. या वाढत्या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसे करू शकता यासाठी खालील पर्याय दिले आहेत.


या संदर्भात, 'तेजी मंदी' या इन्व्हेसमेंट फर्मचे संस्थापक वैभव अग्रवाल (Vaibhav Agarwal) यांनी काही पर्याय सुचवले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. 


1. लिक्विड म्युच्युअल फंड


आजकाल गुंतवणूकदारांसाठी लिक्विड म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ते डेट फंड आहेत जे कमी कालावधीसाठी ठेवले जातात.


2. सोने हा देखील सर्वोत्तम पर्याय 


सोने हा पुढील सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. कारण हा एक हार्ड ऍसेट आहे जो महागाईचा सामना करू शकतो आणि कालांतराने आपले मूल्य टिकवून ठेवू शकतो. 


3. इक्विटी हा देखील बेस्ट ऑप्शन 


गुंतवणुकीचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे इक्विटी. परंतु, येथे इक्विटी म्हणजे अशा थीमचा पाठलाग करणे जे भविष्यात चांगली कामगिरी करतील. अत्याधिक महागाईच्या परिस्थितीत, माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि साहित्य यासारखी क्षेत्रे चांगली कामगिरी करतात.


अन्य पर्याय


महागाईच्या काळात तुमचा पोर्टफोलिओ सर्वाधिक प्रभावित होतो. यावर सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या भांडवलाचे विविध वर्ग जसे की, स्टॉक, बॉंड, सोने, रिअल इस्टेट इत्यादींमध्ये गुंतवणूक करणे. जेणेकरून महागाईच्या काळात तुम्हाला गुंतवणूकीबाबत भीती वाटणार नाही. तसेच, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पोर्टफोलिओ रिबॅलेंस करा आणि नफ्याबद्दल खात्री बाळगा.


महत्वाच्या बातम्या :