Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अरुंधतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं नवं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीने आता तिचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. लवकरच अरुंधतीचं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही साथ मिळाली आहे. अरुंधतीच्या स्वप्नांचा हा प्रवास मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


आशुतोष आणि अरुंधतीच्या गाण्याचे बोल श्रीपाद जोशींनी लिहिले आहेत. तर मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे. निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या विशेष भागातदेखील तो झळकला होता. या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या गाण्याला 1 मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 


काय आहेत गाण्याचे बोल?


‘सोबतीस हलके, सावलीस ऊन...
भोवती तशी ही, मोरपीस खूण...
दोन काठ अपुले, ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी, बंध होई सैल...
बंधनाविना रे ही, गुंतणारी वीण,
हा प्रवास आता, तुझ्यावीण कठीण...
वादळात कोणत्याही, हाक दे कधीही,
हात देत हाती, मी तिथे असेन...’


‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. जीवघेण्या अपघातानंतर आता आशुतोष बरा झाला आहे. त्याने पुन्हा एकदा आपल्या म्युझिक स्कूलचं काम सुरु केलं आहे. नितीन, अरुंधती आणि आशुतोष मिळून या कंपनीचे काम संभाळत आहेत. नव्या कामासाठी आता लोकांची जुळवाजुळव करण्याचं काम त्यांनी सुरु केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका आघाडीवर आहे. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : अरुंधती-आशुतोषमध्ये कडाक्याचं भांडण! रागाच्या भरात अरुंधती कंपनी सोडणार?


Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध करणार अभीचा अरुंधती विरुद्ध वापर; रचणार कट


Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट