RBI Press Conference Highlights : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाच्या बैठकीनंतर महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पतधोरण बैठकीत महागाई, जीडीपी वाढ, आर्थिक विकास आदी मु्द्यांवर त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. महागाईवर नियंत्रण मिळवणे हे आरबीआयचे उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
आरबीआयच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:
- आरबीआयकडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ, रेपो दर 4.9 टक्क्यांवर
- पाचव्या आठवड्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ
- कोरोना महासाथ पूर्वीच्या काळापेक्षाही रेपो दर कमी असल्याचे आरबीआयचे प्रतिपादन
- सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज, याआधी 5.7 टक्के इतका वर्तवला होता अंदाज
- आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक वाढीचा दर 7.2 टक्के राहण्याचा आरबीआयचा अंदाज
- सिमेंट, स्टीलच्या मागणीत मोठी वाढ, रेल्वे मालवाहतुकीतही वाढ
- जागतिक पातळीवर तणावाची स्थिती असल्याने देशातील महागाईवरही याचा परिणाम दिसून येत आहे.
- यंदाच्या आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. एप्रिल-मे महिन्यात 2.5 टक्क्यांची घसरण; परकीय गंगाजळ 600 अब्ज डॉलरहून अधिक
- यंदा मान्सून सामान्य असल्याने ग्रामीण अर्थकारण चांगले राहण्याचा अंदाज
- क्रेडिट कार्डला यूपीआयला जोडले जाणार. पहिल्यांदा रुपे क्रेडिट कार्ड जोडले जाणार
- ग्रामीण सहकारी बँकांना रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज देण्याची परवानगी
- शहरी सहकारी बँकांना घरपोच बँकिंग सेवा देण्यास परवानगी
- E-Mandate साठीची मर्यादा 15 हजार रुपयांवर, याआधी ही मर्यादा 5 हजार रुपये होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: