दिवसाला 48 कोटी तर वर्षाला 17 हजार कोटी रुपयांचा पगार, जगात सर्वात जास्त पगार घेणारे जगदीप सिंग आहेत तरी कोण?
आज आपण ज्या व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहोत, त्या व्यक्तीचा महिन्याचा पगार ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका कपंनीचे सीईओ दिवसाला सुमारे 48 कोटी रुपयांची कमाई करत आहेत.
Highest salary : जेव्हा जेव्हा जगातील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा सत्या नडेलांचे नाव येते. त्याचबरोबर सुंदर पिचाई आणि एलन मस्क यांची देखील नावे समोर येतात. पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहोत, त्या व्यक्तीचा महिन्याचा पगार ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगदीप सिंग असं त्यांचे नाव आहे. त्यांना वार्षिक पगार हा 17500 कोटी रुपये आहे. म्हणजे एका दिवसात सुमारे 48 कोटी रुपयांची कमाई ते करत आहेत. ते भारतीय वंशाचे आहेत.
कोण आहे जगदीप सिंग?
जगदीप सिंग हे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. तसे सध्या अमेरिकेत राहत आहेत. त्यांनी 2010 मध्ये क्वांटमस्केप नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सॉलिड-स्टेट बॅटरीवर काम करते. त्यांच्या बॅटरीने ईव्ही उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. चार्जिंगचा वेळ कमी करणे आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे ही त्यांच्या बॅटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत. कल्पकतेच्या क्षेत्रातील अशा योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. जगदीप सिंगच्या यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे. यानंतर त्यांनी अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी स्वत:ची कंपनीही सुरु केली आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि दूरदृष्टीने क्वांटमस्केपला केवळ एक यशस्वी व्यवसायच नाही तर तंत्रज्ञानाच्या नवनिर्मितीच्या क्षेत्रात मोठं नाव केलं आहे.
पगाराच्या पॅकेजमध्ये 2.3 अब्ज डॉलर किमतीचे समभाग समाविष्ट
जगदीप सिंग यांची कंपनी, QuantumScape 2020 मध्ये यूएस स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. गुंतवणूकदारांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे कंपनीचे मूल्यांकन झपाट्याने वाढले. सिंग यांच्या पगाराच्या पॅकेजमध्ये 2.3 अब्ज डॉलर किमतीचे समभाग समाविष्ट होते. ज्यामुळं त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 17,500 कोटी रुपये होते. हा पगार इंडस्ट्रीतील सर्वात जास्त पगार आहे.
2024 मध्ये सीईओ पदाचा राजीनामा
फेब्रुवारी 2024 मध्ये, जगदीप सिंग यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली होती. मात्र, या निर्णयानंतरही त्यांचा प्रवास थांबला नाही. सध्या ते एका 'स्टेल्थ स्टार्टअप'चे सीईओ आहेत आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
नवीन प्रवास आणि नवीन आव्हाने
जगदीप सिंग यांच्याशी संबंधित माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (@startupjag) उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते पुन्हा एकदा अशा प्रकल्पांवर काम करत आहेत जे भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. त्याचा नवा स्टार्टअप अजूनही गुपित आहे, पण त्याचे भूतकाळातील काम आणि दूरदृष्टी पाहता, त्याचे पुढचे पाऊलही उत्तम असेल हे स्पष्ट होते.