HDFC Life Smart Protect Plan : योग्य यूलिप प्लॅनची निवड कशी करावी, जाणून घ्या 5 स्टेप्स
HDFC Life Smart Protect Plan : या प्लॅनद्वारे गुंतवणूकदारांना सुरक्षितता आणि वित्तीय ध्येय गाठण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होतो.
पगारदारांमध्ये विमा आणि गुंतवणूक याच्यामध्ये योग्य संतुलन राखण्यासाठी यूनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन लोकप्रिय पर्याय म्हणून समोर येत आहे.योग्य यूलिपची निवड तुमच्या वित्तीय ध्येयावर परिणाम करते, तुम्हाला संरक्षण आणि वाढ देखील मिळवून देते. या पाच सोप्या टिप्सच्या माध्यमातून तुम्हाला यूलिप प्लॅनबाबत माहिती जाणून घेऊ शकता.
1.फंड ऑप्शनची संख्या अधिक असताना योग्य यूलिप प्लॅनची निवड कशी कराल?
चांगला यूलिप प्लॅन तुम्हाला विविध फंड ऑप्शन्सचा पर्याय तुमच्या धोका पत्कारण्याच्या क्षमतेला आणि वित्तीय ध्येयाशी सुंसगत असे पर्याय उपलब्ध करुन देतो. तुम्ही इक्विटी, डेब्ट आणि बॅलन्स्ड फंडस यासह अनेक पर्याय पुरेशा लवचिकतेसह तुमचे गुंतवणुकीचे रिटर्न्स ऑप्टिमाइज करण्यासाठी प्राधान्य देऊ शकता. तुम्ही असा प्लॅन निवडा ज्यातून सोप्या पद्धतीनं फंडमध्ये अदलाबदल करु शकता हे तपासून घ्या.
2. लवचिक यूलिप प्लॅन निवडा
यूलिप प्लॅनचं प्रमुख वैशिष्ट्य हे लवचिकता आहे तुम्ही अशा प्लॅनची निवड करा ज्यात तुम्हाला प्रिमियम पेमेंट ऑप्शन्स, लाईफ कवरमध्ये सुधारणा, तुमच्या पोर्टफोलिओ अलॉकेशनमध्ये तडजोड याबाबी आहेत का पाहा.यामुळं तुम्हाला यूलिप प्लॅनमध्ये तुमच्या बदलत्या आर्थिक प्राथमिकता वयाच्या वेगळ्या टप्प्यावर असतील त्यानुसार बदल स्वीकारता येतात.
3. पॉलिसीवरील चार्जेस
यूलिप प्लॅनमध्ये प्रामुख्यानं प्रिमियम अलॉकेशन, फंड मॅनेजमेंट आणि मोर्टालिटी चार्जेस म्हणजे जीवन विमा चार्जेस आकारले जातात. या गोष्टींचा तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होत असतो, त्यामुळं काळजीपूर्वक आढावा घेणं आवश्यक आहे. पारदर्शक आणि स्पर्धात्मक चार्चेस तुमच्या पॉलिसीच्या मूल्यामध्ये वाढ करतात.
4. रायडर्सचं मूल्यांकन करा
यूलिप प्लॅनमध्ये रायडर्स हे तुमच्या कवरेजमध्ये अॅड ऑन म्हणून काम करतात. कॉमन रायडर्समध्ये अपघात विमा लाभ, गंभीर आजार कवर आणि प्रिमियम माफी अशा गोष्टींचा अंतर्भाव होतो. तुम्ही सर्वसमावेशक रायडर्स पर्याय देणाऱ्या यूलिप प्लॅनची निवड करा, ज्यामध्ये तुमच्या विशेष संरक्षणात्मक गरजांची पूर्तता करेल.
5. ऑनलाइन खरेदी
यूलिप प्लॅन ऑनलाइन खरेदी करणं सोपा पर्याय असून यामुळं खर्च देखील कमी होतो. ऑनलाइन प्लॅनमध्ये कमी प्रिमियम लागू शकतो, याशिवाय पेपरवर्क देखील कमी करावं लागतं. तुम्ही तुमच्या घरामधून देखील यूलिप प्लॅन खरेदी करु शकता.
HDFC लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट प्लॅनच का?
HDFC लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट प्लॅनची रचना तुमच्या गुंतवणुकीच्या आणि विम्याच्या गरजा, त्यासोबतचे विशेष लाभ याचा विचार करुन करण्यात आली आहे. विमाधारकाला या प्लॅनमुळं वैयक्तिक आर्थिक ध्येय याचा विचार करुन संयुक्त जीवन विमा आणि मार्केट लिंक्ड इनवेस्टमेंट पर्याय , फंड्समध्ये स्वीच करण्याची लवचिकता हे पर्याय उपलब्ध होतात.
1.फंडचं मूल्य बुस्ट करा : लॉयल्टी अॅडिशन्स, याशिवाय 4 प्रकारांचा वापर करता येईल.
*मोर्टालिटी चार्जच्या दुप्पट किंवा तिप्पट परतावा
*प्रिमियम अलॉकेशनच्या दुप्पट परतावा
*फंड मॅनेजमेंट चार्जेसचा परतावा
*इनवेस्टमेंट गॅरंटी चार्जेसच्या दुप्पट परतावा
2. वाइड रेंज ऑफ फंड ऑप्शन्स : तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा आणि वित्तीय ध्येय याचा विचार करण्यासाठी 9 फंडपैकी पर्यायाची निवड करता येईल.
या स्टेप्सचा वापर करुन तुम्ही एचडीएफसी लाइफ स्मार्ट प्रोटेक्ट प्लॅनची निवड करु शकता. तुम्ही याद्वारे तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करु शकता, याशिवाय गुंतवणूक आणि सुरक्षिततेचा दुहेरी लाभ मिळवू शकता.
Disclaimer :