HDFC Bank Hikes Interest Rates: HDFC चे कर्ज महागले; ग्राहकांवर EMI चा भार वाढणार!
HDFC Bank Interest Rates: एचडीएफसी बँकेकडून एमसीएलआर व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम गृह कर्जावर न होता इतर कर्जांवर होणार आहे.
HDFC Bank Hikes Interest Rates: देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) कर्ज महाग केले आहे. बँकेच्या या निर्णयामुळे लोकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. HDFC बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) 15 बेस पॉईंट्सने वाढवले आहे. नवीन दरातील वाढ 7 जुलै 2023 पासून लागू झाली आहे.
HDFC बँकेच्या MCLR मधील नव्या दरानुसार आता, ओव्हरनाईट एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉईंट वाढ करण्यात आली आहे. याआधी हा दर 8.10 टक्के होता. आता नवीन दर 8.25 टक्के इतका होता. एका महिन्यात एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानंतर 8.20 टक्क्यांहून 8.30 टक्के इतके झाले आहे.
तीन महिन्यांचा दर 10 बेसिस पॉईंटने 8.60 टक्के, सहा महिन्यांचा दर 5 बेसिस पॉइंट्सने वाढवून 8.90 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR मध्ये कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाचा MCLR सध्या 9.05 टक्के आहे. एचडीएफसी बँकेची बहुतांश ग्राहक कर्जे याच्याशी जोडलेली आहेत.
एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआर वाढवण्याच्या निर्णयाचा गृहकर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होणार नाही. केवळ जुनी वैयक्तिक कर्जे आणि एमसीएलआरवर आधारित फ्लोटिंग ऑटो लोनचा व्याजदरावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. बँकांचे गृहकर्ज हे रेपो दराशी जोडलेले आहेत.
HDFC बँकेचा MCLR वाढवण्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे म्हटले जात आहे. RBI ने गेल्या दोन पतधोरण समितीच्या बैठकीत धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑगस्टच्या धोरणात्मक बैठकीतही व्याज दरात कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे विलिनीकरण
एक जुलै 2023 रोजी एचडीएफसी हाउसिंग कंपनी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण झाले. 13 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजवर एचडीएफसीच्या शेअरचे व्यवहार बंद होणार आहेत. एचडीएफसी कंपनी 13 जुलैपासून ‘एचडीएफसी बँक' नावाने आपले शेअर ट्रेड करणार आहे. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केले होते. लवकरच होणाऱ्या प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफएसी लिमिटेड यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही जगातील पाचवी सर्वात मोठी बँक झाली आहे. विलीनीकरण झाले असले तरी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या ठेवीदारांना पूर्वीप्रमाणेच व्याज मिळणार आहे. परंतु, विलिनीकरणानंतर ठेवीदार किंवा कर्जदारांना एचडीएफसी बँकेने ठरवलेल्या व्याजावर परतावा किंवा कर्ज मिळणार असल्याचे कंपनीने याआधीच स्पष्ट केले आहे.