Gold Silver Rate Today : जर तुम्ही आज सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला आजच्या सोन्या-चांदीच्या किमतींबद्दल सांगणार आहोत. सणासुदीनिमित्त शुभ खरेदी करण्यासाठी लोक बाजाराकडे वळत असून किरकोळ आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोने, चांदीची खरेदी वाढत आहे. सोन्या-चांदीच्या किमतीही याच आधारावर वर-खाली होत आहेत. काल सोन्यात किंचित वाढ झाली असली तरी आज किरकोळ बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
सोने-चांदीचा भाव
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 46,000 असून मागील ट्रेडमध्ये याची किंमत 46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी 56,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर फ्युचर्स मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव 16 रुपयांनी वाढून 49166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात 146 रुपयांची वाढ होऊन 55,498 रुपये किलो दराने व्यवसाय होताना दिसत आहे. हे सोन्याचे दर ऑक्टोबर फ्युचर्ससाठी आहेत आणि चांदीचे दर डिसेंबर फ्युचर्ससाठी ठेवण्यात आले आहेत.
जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत 50,200 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,030
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,030 तर,
24 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये इतका असेल.
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 46,030 आहे
तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये आहे.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Rupee Vs Dollar: रुपयाने गाठला ऐतिहासिक नीचांक; डॉलरच्या तुलनेत 81.55 रुपयाचा दर
- Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण