Namrata Sambherao: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतच नवरात्रोस्तवाच्या निमित्त नम्रतानं एक लाईव्ह सेशन केलं. नम्रतानं इन्स्टाग्रामवरील तिच्या लाईव्ह सेशनमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. लाईव्हमधील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं नम्रतानं दिली. 


सांगितला बालपणीचा किस्सा
नम्रतानं तिच्या बालपणीचे काही किस्से लाईव्हमध्ये सांगितले. ती म्हणाली,'मला लहानपणी गरबा आणि दांडिया खेळायला आवडायचं. नवरात्रीला दररोज मी दांडिया खेळायला जायचं. दसऱ्याला बक्षीस समारंभ असायचा. या समारंभात मला बक्षीस म्हणून मला खड्याळ मिळायचं.'


एवढे कॅरेक्टर्स कसे करु शकते? असा प्रश्न नम्रताच्या एका चाहत्यानं लाईव्हमध्ये विचारला. या प्रश्नाला उत्तर देत नम्रता म्हणाली, “माझी निरीक्षण चांगली आहे. मी आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी येथे माझं माहेर. त्यामुळे तिथे आजूबाजूच्या लोकांचे मी निरीक्षण करत होते. ”


लॉली भूमिकेबाबत काय सांगितलं नम्रतानं?
नम्रताच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील लॉली या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या भूमिकेबाबत नम्रता म्हणाली, 'लॉली साकारण्यामागे माझा एकटीचा वाटा नाही. प्रसाद खांडेकर, सचिन गोस्वामी या लोकांचा वाटा आहे. '


पाहा नम्रताचं लाईव्ह:






समीर चौघुलेसोबतच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी  करते. अभिनेत्री सई ताम्हणकर  आणि अभिनेता प्रसाद ओक  हे या शोचे परीक्षक आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Indian Idol : चित्रपट झाले आता नेटकरी करतायत 'बॉयकॉट' इंडियन आयडॉलची मागणी! नेमकं कारण तरी काय?