Share Market Opening Bell: शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंग सत्रात (Share Market Pre-Opening Session) 700 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांक 17, 160 अंकांखाली आहे. आशियाई शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे.  त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 573.89 अंकांच्या घसरणीसह 57,525 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 171.05  अंकांच्या घसरणीसह 17,156 अंकांवर खुला झाला.सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 440 अंकांच्या घसरणीसह 57,658.76 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 164  अंकांच्या घसरणीसह 17,162.95 अंकांवर व्यवहार करत होता. 


शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समधील 30 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 25 शेअरच्या दरात घट झाली. निफ्टी 50 पैकी फक्त सात कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, उर्वरित 43 शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून येत आहे. 


सेन्सेक्समध्ये एचयूएल, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, नेस्ले आणि भारती एअरटेलच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, सन फार्मा, एचीसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज लॅब्ज, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी बँक आदींच्या शेअर दरात घसरण झाली आहे. 


अमेरिकन शेअर बाजारात घसरण


अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला आळा घालण्यासाठी व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावरही दिसून आला. डाऊ जोन्समध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार घसरण दिसून आली. त्यानंतर आज सोमवारी त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: