एक्स्प्लोर

Silver Price : चांदीच्या दरात चार दिवसात 1 लाख 70 हजारांची घसरण, गुंतवणूकदारांना जोरदार फटका, एक किलो चांदीचा दर जाणून घ्या

Silver Price Crash: चांदीच्या दरामध्ये सुरु झालेली पडझड काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. चांदीचा दर सध्या 249300 रुपयांवर पोहोचले आहेत. 

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात ज्या वेगानं वाढ झाली होती, त्याच वेगानं घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरानं 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, अवघ्या चार दिवसात चांदीचे दर 1 लाख 70 हजार रुपयांनी घटले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीचे दर घसरण सुरु आहे. 

31 डिसेंबर 2024 ला चांदीचा दर 86 हजार रुपये होता. चांदीच्या दरानं 29 जानेवारीला 420048 रुपये किलोचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर सुरु झालेली चांदीच्या दरातील घसरण थांबत नसल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी चांदीचे दर 265652 रुपयांवर होते. इंट्राडेमध्ये चांदीचे दर 225805 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर बाजार सावरला आणि चांदीचा दर 249300 रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच उच्चांकावरुन चांदीचा दर 1  लाख 70 हजार 748 रुपयांनी कमी झाला आहे. 

Silver Rate : चांदी पावणे दोन लाखांनी स्वस्त

अर्थंसकल्पापूर्वी चांदीच्या दरानं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केल्यानं चांदीचे दर पडले. 

एकीकडे चांदीचे दर घसरत असले तरी दुसरीकडे सोन्याचे दर देखील पडल्याचं पाहायला मिळतंय. अर्थसंकल्पाच्या दिवशी देखील कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचे दर पडल्याचं पाहायला मिळालं. रविवारी 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 147753 रुपयांवर होते. सोन्याच्या दरात आज 137065 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले आणि इंट्राडे ट्रेडिंग बंद झालं तेव्हा सोन्याचे एका तोळ्याचे दर 146016 रुपयांवर पोहोचले होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 193096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोन्याचा दर 47080 रुपयांची घसरण झाली आहे. 

सोने आणि चांदीच्या दरात का घसरण?

सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्री करत पैसे काढून घेण्याचा निर्णय घेतला. हे देखील घसरणीचं प्रमुख कारण आहे.चांदीची औद्योगिक वापरासाठीची मागणी कमी झाल्यानं चांदीचे दर घसरले आहेत. प्रामुख्यानं चीन आणि यूरोपमधून मागणी कमी झाली आहे. याशिवाय अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जागी केविन वॉर्श यांना संधी देण्याचं वक्तव्य केलं आहे. या सर्वाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होतोय. 

सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मात्र, दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

Embed widget