(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलासादायक! सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दरात झाली मोठी घसरण, सविस्तर माहिती एका क्लिकवर
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी (22 तारखेला) संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 71599 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो आज 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 71325 रुपयांवर घसरला आहे. आज सोन्याच्या दरात 274 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती झाली घसरण?
आज (23 ऑगस्ट 2024) भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. घसरण झाली असली तरी देखील सोन्याचा भाव हा 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो 84 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 71325 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 84072 रुपये प्रति किलो आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 71599 रुपये होता, जो आज 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 71325 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या
देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 9.63 डॉलरने घसरला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्आट्जरीय बाजारात चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानं खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं सोन्या चांदीचे दर वाढत आहेत याचा मोठा फटका खरेदी करणाऱ्यांना बसत होता. आता मात्र, दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. वाढत्या दरामुळं ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता दरात घसरण झाल्याने ग्राहक पुन्हा सोन्याची खरेदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्या चांदीच्या दराची माहिती कशी मिळवायची?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी India bullion and jewellers association ltd. कडून दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या: