Gold Silver Price : सोने झाले स्वस्त! तब्बल 1 हजार रुपयांपर्यंत घसरण, तुमच्या शहरातील दर तपासा
Gold Silver Rate Today 29 June 2022 : आज सोन्याच्या भावात 900-980 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण पाहायला मिळत आहे.
Gold Silver Rate Today 29 June 2022 : सराफा बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे. आज सोन्याच्या भावात 900-980 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण पाहायला मिळत आहे. देशातील अनेक प्रमुख सराफा बाजार जसे की झवेरी बाजार, जयपूर बाजार आदी सोने खरेदीसाठी अतिशय अनुकूल ठरत आहेत. जेथे सोने स्वस्त झाले आहे.
MCX वर सोन्या-चांदीची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 2 रुपयांनी घसरले असून ते 50,820 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिले आहे. ही सोन्याची किंमत ऑगस्ट फ्युचर्ससाठी आहे. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 213 रुपयांनी घसरून 59,326 रुपयांवर आला आहे. चांदीची ही किंमत जुलै फ्युचर्ससाठी आहे.
मुंबईच्या झवेरी बाजारात सोनं स्वस्त
झालं, 22 कॅरेट सोनं आज मुंबईच्या झवेरी बाजारात 900 रुपयांनी घसरून 46750 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं. दुसरीकडे, 24 कॅरेट सोने 980 रुपयांनी स्वस्त होऊन थेट 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरावर आले आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 900 रुपयांनी घसरून 46750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे . त्याचवेळी 24 कॅरेट सोने 930 रुपयांनी स्वस्त होऊन थेट 51,050 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने आले आहे.
हैदराबादमध्ये सोनं स्वस्त
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 900 रुपयांनी घसरून 46750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला . दुसरीकडे, 24 कॅरेट सोने 980 रुपयांनी स्वस्त होऊन थेट 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरावर आले आहे.
सुरतमध्ये सोने 1000 रुपयांनी स्वस्त
गुजरातच्या सुरत शहरात 22 कॅरेट सोने आज 900 रुपयांच्या घसरणीसह 46,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1000 रुपयांच्या घसरणीसह 51030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तुमच्या शहराचा दर तपासा
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
सोने खरे आहे का ते तपासा
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता . ‘BIS Care app’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की बनावट हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.