पॅनकार्डशिवाय 5 लाखांचे सोने खरेदी करता येणार? अर्थसंकल्पात सरकार करणार का मोठ घोषणा?
सरकार अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवरील कर कमी करू शकते. तसेच पॅनकार्डशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करण्यास परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Gold : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला त्यांचा 6वा आणि अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. मात्र, या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा केल्या जाऊ शकतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरकार अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवरील कर कमी करू शकते. तसेच पॅनकार्डशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करण्यास परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीडीपीमध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा सुमारे 7 टक्के
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या उद्योग संस्थेच्या मते, भारताच्या जीडीपीमध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा सुमारे 7 टक्के आहे. म्हणूनच तो व्यवसायासाठी अनुकूल वातावरणास पात्र आहे. याचा फायदा सरकारलाही होणार असल्याचं बोललं जात आहे. रत्न आणि आभूषण उद्योगाने अंतरिम अर्थसंकल्पात सोन्याच्या आयातीवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) मध्ये वाढ मागे घेण्याची विनंती केली आहे. तर्कसंगत कर रचना लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या जीडीपीमध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा सुमारे 7 टक्के आहे आणि म्हणून तो व्यवसायासाठी अनुकूल वातावरणास पात्र आहे. याचा फायदा सरकारलाही होणार असल्याचे मेहरा यांनी सांगितले. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील वाढीव बीसीडी मागे घेण्याची आम्ही अर्थ मंत्रालयाला विनंती करतो. याशिवाय तर्कसंगत कर रचनाही विकसित करायला हवी.
पॅनकार्डशिवाय 5 लाख रुपयांचे सोने
सध्या 12.5 टक्के बीसीडी ॲड व्हॅलोरेमवर लावले जाते. ज्यामुळं आयात सोन्यावर एकूण 18.45 टक्के कर आकारला जातो. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे पॅन कार्ड व्यवहाराची मर्यादा सध्याच्या 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानं पॅन कार्ड व्यवहाराची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख रुपये करण्याची गरज आहे. यासोबतच दैनंदिन खरेदीची मर्यादाही 1 लाख रुपयांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. याशिवाय, GJC ने हिरे आणि दागिने उद्योगासाठी EMI सुविधा पुनर्संचयित करण्याची शिफारस देखील केली आहे.
सोन्या चांदीच्या दरात वाढ
सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. यामुळं, सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होताना दिसत आहे. आज पुन्हा सोन्याचा दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये बुधवारी (31 जानेवारी) सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. बाजार सुरू होताच सोने 200 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर चांदीच्या दरातही प्रति किलो 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्याची किंमत 76500 रुपये झाली आहे. कर आणि एक्साईज ड्युटीमुळं सोन्या-चांदीची किंमत दररोज वाढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: