(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ? वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,000 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : आज आठवड्यातला पहिलाच दिवस. त्याचप्रमाणे तुळशी विवाहदेखील (Tulsi Vivah 2022) सुरु आहे. तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त, समारंभांना तसेच इतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते. या निमित्ताने ग्राहकांची बाजारपेठांत लगबग पाहायला मिळते. सोन्या-चांदीचे दर मागच्या आठवड्यात काहीसे अस्थिर होते. त्यानुसार आजही सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) काहीशी वाढ झालेली पाहायला मिळतेय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,000 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 60,430 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,000
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,750
1 किलो चांदीचा दर - 60,430
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,020
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,768
1 किलो चांदीचा दर - 60,430
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,020
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,768
1 किलो चांदीचा दर - 60,430
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,020
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,768
1 किलो चांदीचा दर - 60,430
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,930
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,686
1 किलो चांदीचा दर - 60,330
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,704
1 किलो चांदीचा दर - 60,350
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला