Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात आजही घसरण; वाचा 22 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : दिवाळीचा (Diwali 2022) सण नुकताच पार पडला. या दरम्यान ग्राहकांनी सोन्या-चांदीची भरपूर खरेदी केली. तसेच, या कालावधीत सोन्या-चांदीच्या दरातही (Gold-Silver Rate) घसरण दिसून आली. हाच दर कायम ठेवत ग्राहकांना आजही सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. या कारणास्तव भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण पाहायला मिळतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,710 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 46,484 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,484
1 किलो चांदीचा दर - 58,360
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,484
1 किलो चांदीचा दर - 58,360
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,484
1 किलो चांदीचा दर - 58,360
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,710
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,484
1 किलो चांदीचा दर - 58,360
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,630
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,411
1 किलो चांदीचा दर - 58,260
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,640
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,420
1 किलो चांदीचा दर - 58,230
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्सने गाठला 60 हजार अंकांचा टप्पा