Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 55,960 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात पहिलाच येणारा सण म्हणजेच संक्रांत (Makar Sankranti 2023) अवघ्या काही दिवसांवर आहे. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे महिला वर्गात सोने खरेदीसाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. मात्र, वर्षाच्या सुरुवातीलाच चीनमधील वाढता कोरोना संसर्ग आणि जागतिक डॉलरच्या संख्येत झालेली वाढ यामुळे भारतात या मौल्यवान धातूंच्या किंमती वाढताना दिसतात. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करू शकतात. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 55,960 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 68,970 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,960
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,297
1 किलो चांदीचा दर - 68,970
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,960
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,297
1 किलो चांदीचा दर - 68,970
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,960
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,297
1 किलो चांदीचा दर - 68,660
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,940
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,278
1 किलो चांदीचा दर - 68,940
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 55,580
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,196
1 किलो चांदीचा दर - 68,820
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 55,870
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,214
1 किलो चांदीचा दर - 68,850
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :