एक्स्प्लोर

सोने खरेदीदारांना दिलासा ,आज दरात घसरण, कोणत्या शहरात किती दर? जाणून घ्या सविस्तर माहिती

सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने चढ उतार होत आहे. सध्या सोन्याच्या दरात लाखाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळं खरेदीरांच्या शिखाला मोठा फटका बसत आहे.

Gold Price : सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने चढ उतार होत आहे. सध्या सोन्याच्या दरात लाखाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळं खरेदीरांच्या शिखाला मोठा फट
का बसत आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. त्यामुळं सोने खरेदी करणाऱ्यांना किंचीत दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याचे काय दर आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा ऐतिहासिक 1 लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर, मंगळवारी 17 जून 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 93040 रुपये दराने विकले जात आहे, तर 24 कॅरेट सोने 101670 रुपये दराने विकले जात आहे. तर चांदीच्या किमतीतही वाढ होत आहे. चांदीचे दर 101500 रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय?

आर्थिक राजधानी मुंबईत 22  कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम 93040 रुपये दराने विकले जात आहे. कोलकाता, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादमध्येही हाच दर आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोने 93190 रुपये दराने व्यवहार करत आहे. कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत चांदीची किंमत समान आहे आणि ती रु. 109800 प्रति किलो. तर हैदराबाद आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत 119800 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते? 

सोन्याच्या म्हणजेच पिवळ्या धातूच्या किंमती निश्चित करण्यामागे अनेक घटक असतात, जसे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतार. याशिवाय, विनिमय दर, डॉलरची किंमत आणि जागतिक परिस्थिती. जर आंतरराष्ट्रीय जगात अशांतता असेल तर गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर राहतात आणि सोन्यात अधिक गुंतवणूक करतात. ते सुरक्षित गुंतवणुकीसाठी ते सर्वात योग्य मानतात. तसेच लग्नापासून ते सणांपर्यंत सोने खूप शुभ मानले जाते. म्हणूनच, लोक त्या दिवशी मोठ्या संख्येने ते खरेदी करतात. याशिवाय, कुटुंबात सोन्याची उपस्थिती देखील त्या कुटुंबाच्या समृद्धीचे प्रतीक मानली जाते. हेच कारण आहे की प्रत्येक परिस्थितीत, कितीही महागाई असली तरी, सोने चांगले परतावा देत असल्याचे सिद्ध झाले आहे.

इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे. ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे. यामुळं जगभरात पुन्हा आर्थिक संकट वाढलं आहे. डॉलर इंडेक्समध्ये देखील कमजोरी पाहायला मिळाली. वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो. सध्या चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Gold Rate News : इस्त्रायल- इराण वादाचा भडका, सोनं एका दिवसात 2000 रुपयांनी महागलं, सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Embed widget