एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Gold Price : सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजारांवर येण्याची शक्यता; एंजेल वनचा अंदाज

जगातील सर्वात मोठा सोने समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड फंडाचे म्हणणे आहे की, 24 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची होल्डिंग्स 0.8 टक्के घसरून 992.65 वर आली जी एप्रिल 2020 नंतर सर्वात निचांकी पातळीवर आहे.

मुंबई : जूनच्या मध्यापासून आजपर्यंत सोन्याच्या किंमती 1680-1840 डॉलरच्या टप्प्यात व्यापार करत आहेत. एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले की सोन्याच्या बाजारात सध्या अनेक घटक वर्चस्व गाजवित आहेत. यामध्ये फेडने आपला क्यूई कार्यक्रम बंद करण्यापासून ते कोविड-19 मुळे अद्यापही जागतिक वित्तीय बाजारापेठांवर होत असलेला परिणाम असा असंख्य घटकांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेच्या तिजोरीतील वाढते उत्पन्न आणि मजबूत डॉलरदेखील सोन्याची दिशा ठरवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. 

सोन्याचे दर कमी करणारे घटक

सोन्याच्या बाजारात बरेच घटक महत्वपूर्ण ठरतात. डॉलरपासून सुरुवात केल्यास निर्देशांका अलीकडच्या आठवड्यात (93.60) वर एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, तर बेंचमार्क यूएस 10 वर्षांच्या ट्रेझरी यील्ड्सने तीन महिन्यांतील सर्वोच्च (1.48%) पातळी गाठली. यामुळे व्याजरहित सोने चांदी धरुन ठेवण्याची संधी वाढली आहे. शिवाय अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी फेडच्या मासिक रोखे खरेदीत कपात करून नोकऱ्यांमधील वाढ कायम ठेवली आहे, सप्टेंबरच्या रोजगार अहवालात आता मध्यवर्ती बँकेच्या बाँडसाठी 'निमुळती' संभाव्य धडक बसणार आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी असेही म्हटले आहे की, सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या नोकऱ्यांची वाढ मजबूत राहिली तर मध्यवर्ती बँक नोव्हेंबरच्या धोरणात्मक बैठकीनंतर आपली मालमत्ता खरेदी मागे घेण्यास सुरुवात करू शकते.

एसपीडीआर गोल्ड ट्रस्टकडून गुंतवणूकीच्या तरलतेमुळे सोन्याच्या किंमतींवरही दबाव निर्माण होत आहे. यावर  जगातील सर्वात मोठा सोने समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड फंडाचे म्हणणे आहे की, 24 सप्टेंबर 2021 पर्यंत त्याची होल्डिंग्स 0.8 टक्के घसरून 992.65 वर आली जी एप्रिल 2020 नंतर सर्वात निचांकी पातळीवर आहे.

सट्टेबाजीची स्थिती - सोन्यातील मंदी दर्शविणारी

अलीकडच्या आठवड्यात सीएफटीसीच्या स्थितीवरून असे दिसून येते की, हेज फंड आणि मनी मॅनेजर्स पिवळ्या धातूतील त्यांची जोखीम कमी करीत आहेत. 1 ऑगस्ट 2021 रोजी पर्यंत नेट लॉन्ग 1,06,662 करार होते जे 21 सप्टेंबर 2021 रोजी नेट लॉन्गमध्ये घटहोत 21954 करारांवर राहिले पुढील आठवड्यात सोन्याच्या किंमतींमधील मंदीचे हे स्पष्ट संकेत आहे.

सोन्याच्या किंमतीत 1680 डॉलर्सच्या दिशेने आणखी सुधारणा होऊ शकते, जी सध्याच्या 17400 डॉलर्सच्या पातळीपेक्षा सुमारे 80 डॉलर्सच्या नकारात्मक बाजूवर आहे. एमसीएक्सवर याचा अर्थ 20 सप्टेंबर 2021 पर्यंत सध्याच्या 46000 रुपयांच्या पातळीपासून सुमारे १२०० रुपये आहे.

प्रथमेश माल्या म्हणाले मजबूत डॉलर, वाढता आशावाद, अमेरिकेचे वाढते ट्रेझरी यील्ड्स, बाँड खरेदी कार्यक्रम बंद करणे यांसारखे घटक सोन्याच्या किंमतीतील सुधार दर्शवणारे आहेत. सोन्याच्या किंमती एका महिन्याच्या दृष्टीकोनातून 45000/10 ग्रॅमच्या दिशेने खालच्या दिशेने जाण्याची आमची अपेक्षा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget