Gold And Silver Rate Today : सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! जाणून घ्या लक्ष्मीपूजनदिनी दागिने किती रुपयांना मिळणार?
सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.
मुंबई : दिवाळी सणाच्या निमित्ताने शध्या संपूर्ण बाजारपेठ फुललेली आहे. कपडे, वेगवेगळ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि विक्री केली जात आहे. सोबतच या सणासुदीच्या काळात दागदागिने खरेदी करण्याकडेही लोकांचा कल दिसतोय. दरम्यान, लोकांचा हाच कल लक्षात घेऊन सराफा बाजारात दागिन्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी सोन्याचा भावा काय (Gold And Silver Rate Today) आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे.
सोन्याचा आजचा भाव काय?
सोन्याच्या दरात आज किरकोळ वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 8151.3 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत हा भाव 170 रुपयांनी जास्त आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 7473.3 रुपये प्रति ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत हा भाव 150 रुपयांनी वाढला आहे.
गेल्या आठवड्याभरात 24 कॅरेट सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट झाली आहे. आठवड्याभरातील ही घट -1.08 टक्के आहे. तर गेल्या महिन्याभरातील घट ही -3.72 टक्के आहे. चांदीचा सध्याचा भाव 103000.0 रुपये प्रति किलो आहे. चांदीचा भाव मात्र 200 रुपयांनी कमी झाला आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव किती?
दिल्लीत आज सोन्याचा भाव 81513.0 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. काल म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी हा भाव 80633.0 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता. आठवड्यापूर्वी म्हणजेच 26 सप्टेंबर 2024 रोजी सोन्याचा हाच दर 79763.0 प्रति दहा ग्रॅम एवढा होता.
दिल्लीत चांदीचा भाव किती आहे?
दिल्लीत चांदीचा भावही 103000.0 प्रति किलो एवढा झाला आहे. काल चांदाचा दर 102200.0 रुपये होता. 26 सप्टेंबर 2024 रोजी हाच दर 101000.0 प्रति एक किलो एवढा होता.
मुंबईत सोन्याचा दर काय?
मुंबईतही सोन्याच्या दरात बदल झाला आहे. मुंबईत सोन्याचा भाव 81367.0 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. काल सोन्याचा हाच भाव 80487.0 रुपये प्रति दहा ग्रॅम एढा होता. 26 सप्टेंबर 2024 रोजी हा दर 79617.0 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता.
मुंबईत चांदीचा भाव किती आहे?
मुंबईत चांदीचा आजचा भाव 102300.0 प्रति किलो आहे. काल हाच भाव 101500.0 रुपये प्रति किलो एवढा होता. 26 सप्टेंबर 2024 रोजी हा दर 100300.0 रुपये प्रति किलो एवढा होता.
हेही वाचा :
ऐन दिवाळीत दिवाळं! गॅस सिलिंडर महागला, घरगुती गॅस सिलिंडरची नेमकी काय स्थिती?