Gold and Silver Purity Test : सोने-चांदीची खरेदी करण्यापूर्वी डाऊनलोड करा 'हे' ॲप; काही मिनिटांतच तपासा शुद्धता, जाणून घ्या सोपी पध्दत
Gold and Silver Purity Test : तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका ॲपच्या साहाय्याने हॉलमार्क असलेल्या सोन्याची सर्व माहिती अगदी काही वेळातच तपासता येऊ शकते.

Gold and Silver Purity Test : सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करताना ग्राहक जी मोठी रक्कम मोजतात, त्या बदल्यात मिळणारे सोने खरोखरच तितके शुद्ध आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. केवळ दागिन्यांची (Gold and Silver Purity Test) चमक पाहून त्याची खरी शुद्धता ओळखणे सोपे नसते. परंतु आता या शुद्धतेबाबत काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका ॲपच्या साहाय्याने हॉलमार्क (Gold and Silver Purity Test) असलेल्या सोन्याची सर्व माहिती अगदी काही वेळातच तपासता येऊ शकते.(Gold and Silver Purity Test)
Gold and Silver Purity Test : BIS हॉलमार्किंग आणि BIS Care App
भारतात सोने आणि चांदीच्या दागिन्यांची शुद्धता निश्चित करण्यासाठी हॉलमार्किंगची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स' (BIS) ही संस्था याचे नियंत्रण करते. ग्राहकांची दागिन्यांच्या शुद्धतेबाबत होणाऱ्या फसवणुकीपासून सुटका व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दागिन्यांवर असलेला हॉलमार्क हा ते दागिने निश्चित केलेल्या मानकांनुसारच बनवले असल्याचे स्पष्ट प्रमाण असतो.(Gold and Silver Purity Test)
ग्राहकांना ही माहिती सहजरीत्या उपलब्ध व्हावी म्हणून BIS ने 'BIS Care App' ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर BIS चा लोगो, कॅरेट किंवा फाईननेस ग्रेड आणि 6 अंकी अल्फान्युमेरिक HUID (Hallmark Unique Identification) नंबर दिलेला असतो.
Gold and Silver Purity Test : HUID नंबरवरून अशी करा शुद्धतेची तपासणी
दागिना खरेदी करण्यापूर्वी त्यावर कोरलेला HUID नंबर व्यवस्थित पाहून घ्या.
तुमच्या मोबाईलमध्ये 'BIS Care App' उघडा आणि त्यातील 'Verify HUID' या पर्यायावर क्लिक करा.
तेथे दागिन्यावरील 6 अंकी HUID नंबर टाका.
नंबर प्रविष्ट करताच दागिन्याशी संबंधित सर्व तपशील मोबाईल स्क्रीनवर दिसू लागतील. यामध्ये ज्वेलर्सचे नाव, हॉलमार्किंग सेंटरचे नाव, दागिन्याचा प्रकार आणि हॉलमार्किंग केल्याची तारीख या सर्व गोष्टींचा समावेश असतो. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत सोपे जाते.
Gold and Silver Purity Test : सोन्या-चांदीच्या शुद्धतेचे ग्रेड्स
भारतात सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये विभागलेली असते:
सोने: 14K (585), 18K (750), 20K (833), 22K (916), 23K (958) आणि 24K (995).
'BIS Care App' च्या मदतीने हॉलमार्क असलेल्या चांदीच्या दागिन्यांची माहितीसुद्धा अशाच प्रकारे HUID नंबर टाकून तपासता येते.
चांदी: चांदीसाठी 800, 835, 925, 958, 970, 990 आणि 999 हे शुद्धतेचे ग्रेड्स निश्चित करण्यात आले आहेत.
Gold and Silver Purity Test : खरेदी करताना घ्यावयाची काळजी
सोने किंवा चांदी खरेदी करताना केवळ त्याची किंमत आणि डिझाइन पाहून निर्णय घेऊ नका. दागिन्यांवर हॉलमार्क आणि HUID नंबर नक्की तपासा. खरेदी पूर्ण करण्यापूर्वी 'BIS Care App' मध्ये HUID नंबर टाकून खात्री करून घ्या. यामुळे तुम्हाला शुद्धतेबाबत खात्री मिळेल आणि फसवणुकीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून तुमचा बचाव होईल.
महत्त्वाच्या बातम्या





















