लोकसभा निकालानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ, कोणत्या शहरात किती दर? सविस्तर माहिती एका क्लिकवर
लोकसभेच्या निकालानंतर (Loksabha Election) लगेच सोन्या चांदीच्या दरातही (Gold Silver Price) वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price News: लोकसभेच्या निकालानंतर (Loksabha Election) लगेच सोन्या चांदीच्या दरातही (Gold Silver Price) वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा कात्री लागत आहे. सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. चांदीच्या दरात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झालीय. तर सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झालीय.
वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ
आज वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. आज चांदीच्या दरात 1400 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचे दर हे प्रति किलो 91,800 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरातील ही वाढ मोठी समजली जातेय. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव हा 90,444 रुपये प्रति किलो होता. चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही वाढ झालीय. कालच्या तुलनेत सोने आज 400 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. सध्या सोने 73 हजार रुपयांवर पोहोचले आहे. बुधुवारी सोन्याचा दर हा 72,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?
दिल्ली - 24 कॅरेट सोने 73 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 95,500 रुपये किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 74,180 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 98,000 रुपये प्रति किलो
मुंबई - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलोग्रॅम
लखनौ - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलोग्रॅम
जयपूर - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 93,500 रुपये प्रति किलो
पुणे - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,500 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी महाग
एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर वाढत आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही देशांतर्गत बाजाराप्रमाणे सोन्या-चांदीचे भाव वाढत आहेत. सध्या सोन्यामधील गुंतवणूक ही फायदेशीर ठरत आहे. त्यामुळं मोठ्या बँका संस्था मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करत आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मध्यंतरी काही दिवस अल्प प्रमाणात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: