भारतातील सर्वात महाग मासा कोणाता? किंमत ऐकूण व्हाल थक्क
Fish : मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याच्या प्रजातींची माहिती करून घेतली पाहिजे. कारण माशांच्या चांगल्या प्रजातींचे संगोपन केले तरच त्यांना बाजारात चांगला दर मिळेल.
Fish : अनेक ठिकाणचे शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंदा म्हणून मत्स्यपालनही (fish) करत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारांकडूनही मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय मत्स्यशेतीसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदानही देते. मात्र, मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याच्या प्रजातींची माहिती करून घेतली पाहिजे. कारण माशांच्या चांगल्या प्रजातींचे संगोपन केले तरच त्यांना बाजारात चांगला दर मिळेल. आज आपण अशा माशाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याची किंमत हजारात नाही तर लाखात आहे. म्हणजे एक किलो मासळी विकत घेण्यासाठी तुम्हाला अनेक लाख रुपये खर्च करावे लागतात.
जाणून घ्या महाग माशाबद्दल सविस्तर माहिती?
आपण भारतीतील सर्वात महाग घोळ माशाबद्दल माहिती पाहणार आहोत. या माशामध्ये असे अनेक गुण आहेत जे आरोग्य आणि चव या दोन्ही दृष्टीने उत्तम मानले जातात. घोळ मासा हा भारतातील सर्वात मोठ्या माशांपैकी एक आहे. हा मासा गुजरात आणि महाराष्ट्रातील सागरी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचा रंग हलका सोनेरी आणि कांस्य तांब्यासारखा आहे. तसेच चव आणि आरोग्यदायी गुणधर्मांमुळे याला मोठी मागणी आहे.
घोळ मासळीची किंमत किती?
घोळ मासळीचा भाव चांगला आहे. या 1 माशाची किंमत अंदाजे 5 लाख रुपये आहे. कारण या माशापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. याशिवाय बिअर आणि वाईन बनवण्यासाठीही याचा वापर होतो. इतकंच नाही तर त्यामध्ये सापडलेल्या एअर ब्लॅडरचा उपयोग औषधे बनवण्यासाठीही केला जातो. या माशाचे मांस आणि मूत्राशय स्वतंत्रपणे विकले जातात. त्याचे मूत्राशय अनेक देशांमध्ये निर्यात केले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मासे पाळायचे असतील तर तुम्ही हा मासा पाळू शकता.
घोळ माश्याला राज्य मासळीचा दर्जा
घोळ माश्याच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर 2023 मध्ये याला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे. सायन्स सिटी, अहमदाबाद येथे आयोजित दोन दिवसीय ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये त्याला राज्य मासा घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: