एक्स्प्लोर

Gautam Adani on Hindenburg Report: चुकीची माहिती अन् खोटे आरोप म्हणजे, 'हिंडेनबर्ग अहवाल'; गौतम अदानींचा पलटवार

Gautam Adani on Hindenburg: हिंडेनबर्ग अहवाल चुकीची माहिती आणि बिनबुडाच्या आरोपांचं मिश्रण असल्याचं म्हणत गौतम अदानींनी थेट निशाणा साधला आहे.

Gautam Adani on Hindenburg Report: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani)  यांनी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गला (Hindenburg) फटकारलं आहे. आमचे नुकसान करण्याच्या हेतूनं हिंडेनबर्ग यांनी त्यांच्या अहवालात आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप केले असल्याचंही गौतम अदानी यांनी म्हटलं आहे. 

हिंडेनबर्ग अहवाल चुकीची माहिती आणि बिनबुडाच्या आरोपांचं मिश्रण असल्याचं गौतम अदानी म्हणाले आहेत. हा अहवाल मुद्दाम आणि बदनामीच्या हेतून तयार केला होता, ज्याचा उद्देश आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा होता, असंही गौतम अदानी म्हणाले आहेत. 

जानेवारीत आलेला हिंडेनबर्गचा अहवाल 

याच वर्षी जानेवारीमध्ये एक अहवाल जाहीर करत हिंडेनबर्गनं अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड असल्याचं म्हटलं होतं आणि अदानी ग्रुपनं शेल कंपन्यांच्या माध्यमातून खात्यात फेरफार केल्याचा आरोपही केला होता.

समूहाच्या 2023 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना गौतम अदानी म्हणाले की, हिंडनबर्गनं अदानी समूहाची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशानं हा अहवाल प्रसिद्ध केला होता. शेअर्सच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणं तसेच शेअरच्या किमती घसरून नफा कमावणं हा अहवालाचा उद्देश असल्याचंही अदानी म्हणाले आहेत. 

गौतम अदानी म्हणाले की, हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर लगेचच आम्ही तो फेटाळला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. हा अहवाल मे 2023 मध्ये सार्वजनिक करण्यात आला आणि त्यामध्ये तज्ज्ञ समितीला कोणत्याही नियामक त्रुटी आढळल्या नाहीत.

20 हजार कोटींचा FPO परत घेतला

गौतम अदानी म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालानंतर एफपीओचे पूर्ण सदस्यत्व असूनही, आम्ही गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 27 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहानं त्यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ जारी केला होता आणि नंतर फुल सब्सक्राइब घेतल्यानंतर अचानक तो मागे घेतला. 20 हजार कोटी रुपयांचे एफपीओ काढून कंपनीनं सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत केले होते.

हिंडेनबर्गनं आपल्या घृणास्पद अहवालात अदानी समूहावर खात्यातील फसवणूक आणि स्टॉक व्हॅल्यूमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यामुळे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे समूहाचे बाजार मूल्य नीचांकी पातळीवर पोहोचले आणि ते सुमारे 145 अब्ज डॉलर्सनी घसरलं होतं.

FPO म्हणजे काय?

कंपनीसाठी पैसे उभारण्याचा एक मार्ग म्हणजे, FPO. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. हे शेअर्स आधीपासूनच बाजारात असलेल्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget