पालक शेतीचा अनोखा प्रयोग, तरुण शेतकऱ्यांनी केली 15 लाखांची कमाई
वाराणसीच्या (varanasi) तीन शेतकऱ्यांनी पालकाच्या शेतीतून (spinach farming) आपली आर्थिक प्रगती साधली आहे. पालक शेतीतून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
Success Story: अलिकडच्या काळात अनेक तरुण शेतकरी प्रयोगशील शेती (Experimental agriculture) करताना दिसत आहेत. कमी खर्चात लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. आज आपण अशाच काही प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. वाराणसीच्या (varanasi) तीन शेतकऱ्यांनी पालकाच्या शेतीतून (spinach farming) आपली आर्थिक प्रगती साधली आहे. पालक शेतीतून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. या शेतकऱ्यांनी एका हेक्टरमध्ये 15,00,000 रुपयांचा नफा मिळवला आहे.
वाराणसीच्या अलाउद्दीनपूरचे प्रताप नारायण मौर्य, चितकपूर, मिर्झापूरचे अखिलेश सिंग आणि कुट्टुपूर, जौनपूरचे सुभाष के पाल या प्रगतीशील शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती म्हणून पालकाची लागवड केली होती. या पिकातून त्यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. या शेतकऱ्यांचा पालक शेतीचा यशस्वी प्रयोग पाहून अनेक शेतकऱ्यांनी पालकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकाच्या भाजीत मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे
पालकाच्या पानांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. पालकामध्ये भरपूर फायबर असते आणि ते पचनास मदत करते. भरपूर प्रमाणात लोह असल्याने, ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी तसेच ज्यांना त्यांच्या आहारात लोह आवश्यक आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर आहे. पालक पिकासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते.
हेक्टरी दीड लाख रुपयांचा खर्च
अलाउद्दीनपूरचे प्रताप नारायण मौर्य, चितकपूर, मिर्झापूरचे अखिलेश सिंग आणि कुट्टुपूर, जौनपूरचे सुभाष के पाल या शेतकऱ्यांचा पालकाच्या शेतीचा प्रयोग पाहून अनेक शेतकऱ्यांनी पालकाची यशस्वी लागवड केली. पालकाच्या लागवडीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. तर पालकाची सरासरी विक्री किंमत ही 15 ते 20 रुपये प्रति किलो आहे. यातून शेतकऱ्यांना 12,00,000 ते 15,00,000 रुपयांचे प्रति हेक्टर उत्पन्न मिळाले आहे.
पालकाच्या लागवडीसंदर्भात माहिती
शेतकरी पालकाच्या बियांची थेट जमिनीवर ओळीत पेरणी करु शकतात किंवा शेतात पसरवू शकतात. रोपांना वाढण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. थेट पेरणी करताना, 1 ते 1.18 इंच (2.5-3 सेमी) खोलीवर ओळींमध्ये बिया पेराव्यात. पालक 10 ते 21 अंश सेल्सिअस तापमानात वाढू शकतो. जेव्हा आपण वसंत ऋतु किंवा शरद ऋतूमध्ये पालक लागवड करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा हलकी सावली आणि चांगला निचरा असलेल्या ठिकाणी लागवड करणे योग्य आहे. हिवाळ्यात, पालकाच्या भाजीची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीचा भाजीवर परिणाम होतो.
महत्त्वाच्या बातम्या: