मुंबई : निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून कर्मचारी  भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या (EPFO) माध्यमातून गुंतवणूक करतात. निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम नंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून दिली जाते. दरम्यान,  ईपीएफओने नुकतेच एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणानुसार ईपीएफओतर्फे खातेधारकांना तब्बल 50 हजार रुपयांचं बोनस दिलं जाणार आहे. मात्र हे बोनस मिळवण्यासाठी खातेधारकांना एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. ही अट पूर्ण केल्यावरच 50 हजार रुपयांचे बोनस मिळू शकेल.


तब्बल 50 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळू शकते


ईपीएफओचे अनेक नियम लोकांना माहिती नसतात. यातील लॉयलिटि कम लाईफ बेनिफिट्स नावाचा एका नियम आहे. या नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. पण त्यासाठी एक अट आहे. कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत 20 वर्षे एकाच एपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेधारकास तब्बल 50 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते. म्हणजेच सतत 20 वर्षे खातेधारकाने आपले ईपीएफ खाते बदलू नये. तसे केल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल, अशी ईपीएफओ संघटनेची अट आहे. 


केंद्र सरकारने प्रस्तावाला दिली मंजुरी


काही दिवसांपूर्वीच सीबीडीटीने ईपीएफ खाते न बदलता गुंतवणूक करणाऱ्या खाताधारकांना लॉयल्टी-कम-लाईफचा लाभ देण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारनेदेखील या प्रस्तावास मंजुरी दिली होती.


हा फायदा नेमका कोणाला मिळणार? 


लॉयल्टी-कम-लाईफचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळणार आहे. ज्या खातेधारकाचे मूळ वेतन (बेसिक सॅलरी) 5,000 रुपयांपर्यंत आहे त्यांना 30,000 रुपये लॉयल्टी-कम-लाईफ मिळेल. ज्या लोकांचे मूळ वेतन 5,001 ते 10,000 रुपये असेल त्यांना 40,000 रुपये दिले जातील. तर ज्या लोकांचे मूळ वेतन 10,000 रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना या नियमाअंतर्गत 50,000 रुपयांचा लाभ दिला जाईल. 


या गोष्टीची घ्यावी विशेष काळजी? 


ईपीएफ खात्यात पैसे जमा करताना हे अतिरिक्त 50 हजार रुपये मिळवायचे असतील तर एक काळजी घ्यावी लागेल. नोकरी बदलताना सध्या चालू असलेले ईपीएफ खातेच कायम ठेवायचे. म्हणजे नव्या नोकरीच्या ठिकाणीदेखील पूर्वीच्याच ईपीएफ खात्यात रक्कम जमा करायची. तशी माहिती तुमच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कंपन्यांना द्यावी लागेल.


हेही वाचा :


फॉर्म-16 म्हणजे नेमकं काय रे भाऊ, या कागदपत्रामुळे कर कसा वाचू शकतो?


'या' बँकांमध्ये FD करा मालामाल व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर


म्हातारपणी पेन्शन देणारी 'एनपीएस' योजना काय आहे? मध्येच गुंतवणूक थांबवल्यास काय होणार? जाणून घ्या सविस्तर!