मुंबई : सध्या आयटीआर रिटर्न (ITR) भरण्यासाठी नोकरदारांची लगबग चालू आहे. दरवर्षी सामान्यपणे 31 जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख असते. तुम्ही तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये आयटीआर आणि फॉर्म-16 (Form 16) बद्दल नक्कीच ऐकले असेल. फॉर्म-16 हा प्राप्तिकर भरण्यासाठीचे महत्त्वाचे कागदपत्र आहे. याच पार्श्वभूमीवर फॉर्म-16 म्हणजे काय? ते जाणून घेऊ या..
कोणत्याही नोकरदाराला फॉम-16 भेटतो. कर्मचारी ज्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीकडून हा फॉर्म-16 दिला जातो. या फॉर्मवर कर्णचाऱ्याचे वेतन, कर-कपात आणि कराबाबत इतर माहिती दिलेली असते. याच फॉर्म-16 च्या मदतीने कर्मचाऱ्याच्या पॅन कार्डचीही माहिती मिळते.
फॉर्म-16 मध्ये टीडीएसची सविस्तर माहिती (What is Form 16)
तुम्ही ज्या संस्थेत काम करता, ती संस्था तुम्हाला फॉर्म-16 देते. वर्षभरात तुमच्या पगारातून किती कर कापला गेलेला आहे. म्हणजेच या फॉर्मवर तुमच्या टीडीएसविषयी माहिती दिलेली असते. ज्या वेळी तुम्ही आयटीआर भरता तेव्हा या फॉर्म-16 ची तुम्हाला फार मदत होते. या फॉर्मच्या मदतीने टीडीएसद्वारे तुम्हाला किती रुपये रिफंड मिळू शकतील, हे समजते.
कर गोळा करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी टीडीएसची व्यवस्था निर्माण करण्यात आली. एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारानुसार त्याला किती कर द्यावा लागेल, हे ठरवले जाते. कंपनीला हा कर कापण्याचा अधिकार असतो. कर्मचाऱ्याच्या पगारातून कापलेला हा कर कंपन्या सरकारला पाठवतात.
कोणत्या कायद्यानुसार फॉर्म-16 जारी केला जातो (Rule For Form 16A)
प्राप्तिकर कायदा-1961 च्या कलम-203 नुसार फॉर्म-16 जारी केला जातो. पगार मिळण्याआधीच ज्या कर्मचाऱ्यांचा पगार कंपनीमार्फत कापला जातो, त्या कर्मचाऱ्याला फॉर्म-16 दिला जातो. हा फॉर्म 16A आणि 16B अशा दोन प्रकारचा असतो. सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि गेल्या आर्थिक वर्षात कंपनीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील कंपन्यांना हा फॉर्म जारी करावा लागतो.
फॉर्म 16A आणि 16B मध्ये नेमकं अंतर काय? (What Is Difference Between Form 16A And Form 16B)
फॉर्म-16A मध्ये कर्मचाऱ्याचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड याची माहिती दिलेली असते. याच फॉर्ममध्ये टीडीएसचीही माहिती दिलेली असते. फॉर्म-16B मध्ये कर्मचाऱ्याच्या उत्त्पन्नाची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराचा तपशील, पगारात कशा-कशाची कपात केली जाते, हाऊस रेंट अलाऊंस (एचआरए), सेव्हिंग डिटेल्स आदी दिलेली असते.
फॉर्म-16 मुळे वाचू शकतो टॅक्स
फॉर्म-16 हा तुम्ही जमा केलेल्या टीडीएसचा प्रुफ असतो. तसेच या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही नेमकं कोठे-कोठे सेव्हिंग करत आहात, हे समजते. तसेच येणाऱ्या काळात कोण-कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे शक्य आहे, ज्यामुळे कर वाचेल, हेदेखील या फॉर्ममधून समजते.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात चढ-उतार चालूच, आज पुन्हा महागलं; पण नेमकं कारण काय?
'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!