FD Yojana : सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावं म्हणून सरकार (Govt) विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून मोठा लाभ गुंतवणूकदारांना (Investment) होतो. यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY). पण या योजनेपेक्षाही अधिकचा लाभ विविध बँकांच्या FD योजनांमध्ये होऊ शकतो. कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला लाभ मिळू शकतो, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. मुलीचे वय जर 9 वर्षांपर्यंतचे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेवर सरकार 8.2 टक्के दरानं व्याज देते. तर आयकराच्या कलम 80C अंतर्गत या योजनेवर 1.50 लाख रुपयांची सूट मिळते. दरम्यान, विविध बँकांच्या अशा FD योजना आहेत, त्यामध्ये तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा जास्त लाभ मिळतो.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेत जर तुम्ही FD केली तर तुमचा मोठा फायदा होतो. यामध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवीवर तुम्हाला 700 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD योजनेवर 8.25 टक्के मजबूत व्याजदर देते. 2 ते 3 वर्षांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. त्यामुळं या योजनेत गुंतवणूक करणे परवडते.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बँकेत FD केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. 2 ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD योजनांवर 8.25 टक्के परतावा मिळतो. तर 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या FD योजनांवर 8.50 टक्क्यांचा परतावा मिळतो. त्यामुळं या योजनेमध्ये गुंतवणूक करणं परवडते.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक यामध्ये देखील गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. या योजनांवर चांगला परतावा मिळतो. जन स्मॉल फायनान्स बँकमध्ये 65 दिवसांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. तर 1 वर्ष ते 730 दिवसांच्या FD योजनेवर 8.25 टक्के व्याजदर मिळतो.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
स्मॉल फायनान्स बँक हा देखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहेय यावर देखील चांगला परतावा मिळतो. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 444 दिवसांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर देते. तर 888 दिवसांच्या FD योजनेवर 8.25 टक्के व्याज दर देत आहे. त्यामुळं सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा या योजनेवर चांगला परतावा मिळतो.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना 8.25 टक्के व्याजदराने 1 वर्ष ते 15 महिन्यांची FD योजना देते. तर 15 महिने ते 2 वर्षांच्या FD योजनेवर 8.50 टक्के व्याजदर मिळतो. 2 वर्षांच्या FD योजनेवर 8.60 टक्के व्याजदर देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक हा देखील गुंतवणुकदारांसाठी चांगला पर्याय आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 6 महिने ते 201 दिवसांच्या FD योजनेवर 8.75 टक्के व्याजदर देते. तर बँक 501 दिवसांच्या FD योजनेवर 8.75 टक्के, 701 दिवसांच्या FD योजनेवर 8.95 टक्के आणि 1001 दिवसांच्या FD योजनेवर 9 टक्के व्याजदर देते. त्यामुळं ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं.
महत्वाच्या बातम्या: