मुंबई : मुंबईकरांनो, तुम्ही रविवारी रेल्वे प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी, 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचेल. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर 15 मिनिटांनी पोहोचेल. 


डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल.


अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 04.44 वाजता पोहोचेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत 


सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील.


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी 10.45 ते 5.13 वाजेपर्यंत बंद राहतील.


डाउन हार्बर मार्गावर 


ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.04 वाजता सुटेल. गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 04.51 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 04.56 वाजता वांद्रेसाठी सुटेल.


अप हार्बर मार्गावर


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 09.40 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.28 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 04.58 वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) वरुन विशेष रेल्वे सेवा चालवल्या जातील.