Elon Musk VS Twitter : टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) कंपनी 44 अब्ज डॉलरमध्ये विकत घेण्याचा करार रद्द केला आहे. मात्र ट्विटरसोबतचा करार रद्द करणं एलॉन मस्क यांना महागात पडण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्याविरोधात ट्विटर कंपनी कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटर कंपनी एलॉन मस्क यांनी कोर्टात खेचण्याची पूर्ण तयारी करत आहे. यासाठी ट्विटर कंपनीनं मोठी कायदेशीर कंपनी अर्थात टॉप लॉ फर्मसोबत संपर्कात असल्याची माहिती आहे. 


ट्विटरने एलॉन मस्क यांच्याविरोधात कायदेशीर लढाईचा पवित्रा निवडल्याचं चित्र आहे. ट्विटर कंपनीनं न्यूयॉर्कमधील टॉप लॉ फर्म Wachtell, Lipton, Rosen & Karz LLP ची या लढाईसाठी नियुक्ती केली आहे. ट्विटर कंपनी पुढील आठवड्यात डेलावेअर येथे मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. तर मस्क यांनीही स्वत:च्या बचावाची तयारी केली आहे. मस्क यांनी ट्विटर विरोधातील या खटल्यासाठी Quinn Emanuel Urquhart & Sullivan या लॉ फर्मची नियुक्ती केली आहे.






ट्विटर खरेदीचा 44 अब्ज डॉलरचा करार रद्द
एलॉन मस्क यांनी शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलंय. कंपनीने अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे. एलॉन मस्क यांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केले आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरली.'



महत्त्वाच्या इतर बातम्या