Twitter : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने 46,000 हून अधिक भारतीय अकाऊंटवर बंदी घातली आहे. ट्विटर कंपनीनं मे महिन्यामध्ये 46 हजारांहून अधिक अकाऊंटवर बंदी घातली आहे. ट्विटरनं कंपनीनं एका अहवालामध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटरने मे महिन्यात आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय वापरकर्त्यांच्या 46,000 हून अधिक खात्यांवर बंदी घातली. ट्विटरने मासिक अहवालात हे सांगितले आहे. या अहवालानुसार, ट्विटरने बाल लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह सामग्रीशी संबंधित 43,656 खात्यांवर बंदी घातली आहे. तर 2,870 ट्विटर अकाउंट्सवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्द्ल बंदी घालण्यात आली आहे.


ट्विटरने हजारो खाती केली बंद
भारतात ट्विटरला 26 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 दरम्यान स्थानिक तक्रार यंत्रणेकडून 1,698 तक्रारी प्राप्त झाल्या. ट्विटरने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही वापरकर्त्यांना त्यांचे विचार मांडण्याची मुभा देतो आणि आम्ही त्यांचे स्वागतही करतो, परंतु आम्ही इतरांचा आवाज दाबणारी वर्तणूक खपवून घेणार नाही. एखाद्याला धमकावण्याचं काम, तसं वर्तन करणं हे चुकीचं आहे.'


Twitter व्यतिरिक्त, Google India नेही त्यांच्या मासिक अहवालात देखील माहिती दिली की त्यांनी मे महिन्यात 3,93,303 आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या आहेत. यामध्ये बाल लैंगिक शोषण आणि दहशतवाद यांसारख्या गोष्टी असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे.


व्हॉट्सअ‍ॅपनेही अकाऊंट्स केले बंद
व्हॉट्सअ‍ॅपने ही माहिती दिली होती की, मे महिन्यात त्यांनीही अनेक खाती बंद केली आहेत. नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपने आपला मासिक अहवाल सादर केला. यामध्ये कंपनीने खुलासा केला की मे 2022 मध्ये कंपनीने भारतातील 19 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिलमध्ये भारतात 16.6 लाख खराब बंद केली आहेत. ताज्या अहवालात, कंपनीने उघड केलं आहे की त्यांनी 1 मे ते 31 मे दरम्यान 19 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या