Twitter Employees Fired : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रवक्त्याने ट्विटरने 30 टक्के कर्मचारी कमी केले असल्याचं सांगितलं आहे. मात्र याबाबत अधिकची माहिती किंवा कर्मचाऱ्यांची संख्या उघड केलेली नाही. टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विट डील अखेरच्या टप्प्यात असतानाच 30 टक्के कर्मचाऱ्यांनी कामावरून काढण्यात आलं आहे. एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केलं आहे.


ट्विटर कंपनी एचआर विभागातील (HR Department) 30 टक्के कर्मचाऱ्यांनी कामावरून कमी केलं आहे. याआधी कंपनीनं या विभागातील (Talent Acquisition Team) नवीन नोकरभरती थांबवली होती. त्यानंतर आता कंपनीने 30 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


ट्विटरने अलिकड्च्या काळात नवीन कर्मचारी भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी गेल्या महिन्यात ट्विटरने इतर विभागातील कर्मचाऱ्यांना अधिक व्याप्ती किंवा संधी असणाऱ्या विभागात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम कंपनीची गुणवत्ता वाढवण्यावर होईल, असा कंपनीचा अंदाज आहे.


सुमारे 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं
एलॉन मस्क यांची ट्विटर डील लवकरच पूर्ण होणार आहे. त्याआधी गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचं सांगण्यात येत आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि स्नॅपचॅट यासारख्या कंपन्यांसोबत स्पर्धेत कायम राहण्यासाठी ट्विटरकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 


सीईओ पराग अग्रवाल यांचं पदही धोक्यात?


पराग अग्रवाल यांनी सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. एलॉन मस्क यांच्यासोबत कराराच्या घोषणेनंतर ट्विटरने अनेक कर्मचारी गमावले आहेत. शिवाय एलॉन मस्क यांच्यासोबत ट्विटरची डील पूर्ण झाल्यावर पराग अग्रवाल यांचं सीईओ पदही धोक्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


महत्वाच्या बातम्या :