Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे.  समीर चौघुले (Samir Choughule), विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,गौरव मोरे  आणि प्रसाद खांडेकर या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करते. अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हे या शोचे परीक्षक आहेत. या शोमधील अभिनेता दत्तू मोरेनं  (Dattu More) नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दत्तूच्या चाळीबाबत लिहिलेलं आहे.  


दत्तू हा ठाण्यातील रामनगर भागातील एका चाळीत राहतो. या चालीला दत्तूचं नाव देण्यात आलं आहे. दत्तूनं एका वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दत्तूनं लिहिलं, ' खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण काही वेगळंच प्रेम आहे आमच्या नगरातल्या लोकांचं माझ्यावर (चाळीतल्या लोकांच तर फारच) आणि त्या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन ज्यांनी आज पर्यंत मला आज एवढं प्रेम दिलं,कौतुकाची थाप दिली.असच प्रेम करत रहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच ऊर्जा येते आणि यात अजून एक फार मोठा वाटा आहे तो आमच्या "महाराष्ट्रची हास्य जत्रा"( MHJ )फॅमिलीचा आणि सोनी मराठी चॅनलचा.'


दत्तूची पोस्ट:






दत्तूच्या पोस्टवर लाइक अन् कमेंट्सचा वर्षाव
दत्तूच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. 'दादा तुझा आम्हाला अभिमान वाटतो', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दादा तुझ अभिनंदन'


हेही वाचा :


Nikhil Bane : जुन्या जागेत एक आत्मा राहतो... चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराबद्दल काय म्हणाला 'हास्यजत्रा फेम' निखिल बने....