Coronavirus Cases Today in India : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे, पण वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचं कारण बनली आहे. देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनारुग्ण सापडले आहेत, त्यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे. 16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 30 हजारांच्या पार गेली आहे. तर कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यानेही पाच लाख 25 हजारांचा आकडा पार केला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजारांपार
देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची कमी भर पडली आहे, पण सक्रिय रुग्णांचा आलेख मात्र चढतानाच दिसत आहे. देशात सध्या 1 लाख 30 हजार 713 सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात 14 हजार 629 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात 2 हजार 591 नव्या रुग्णांची भर
रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात 2 हजार 591 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. तसेच 2 हजार 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 37 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.92% एवढे झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात, ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आली होती यात्रा
- Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचे इंधन दर
- J&K : जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी संघटनांकडून गेल्या चार वर्षांत 700 तरुणांची भरती, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती