(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिराला एका महिन्यात किती मिळाली देणगी? दाण एकूण तुम्हाला बसेल धक्का
एका महिन्यात अयोध्या राम मंदिराला 25 कोटी रुपयांची देणगी (Donations) मिळाली आहे. राम मंदिर ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा (Ram mandir) उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हा सोहळा संपन्न झाल्यापासून एका महिन्यात अयोध्या राम मंदिराला 25 कोटी रुपयांची देणगी (Donations) मिळाली आहे. राम मंदिर ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रोखीचा प्रचंड प्रवाह व्यवस्थापित करण्यासाठी चार स्वयंचलित हाय-टेक मोजणी यंत्रे बसवली आहेत. तर मोठ्या प्रमाणावर सोन्याची देणगी देखील मंदिराला देण्यात आली आहे.
आतापर्यंत 60 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
देणगीबद्दल सविस्तर माहिती देताना प्रकाश गुप्ता म्हणाले की, राम मंदिराला आत्तापर्यंत 25 किलो सोन्या-चांदीचे दागिने, चेक, ड्राफ्ट आणि रोख रकमेचा समावेश आहे. आमच्याकडे थेट ट्रस्टच्या बँक खात्यांमध्ये केलेल्या ऑनलाइन व्यवहारांची माहिती नाही. रामभक्त मोठ्या प्रमाणात चांदी-सोन्याच्या वस्तू दान करत आहेत. 23 जानेवारीपासून आतापर्यंत 60 लाखांहून अधिक भाविकांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले आहे.
रोख मोजणी कक्ष बांधण्यात येणार
राम मंदिर ट्रस्टला रामनवमी उत्सवाच्या आसपास देणग्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर अयोध्येत सुमारे 50 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ट्रस्टने पावत्या देण्यासाठी डझनभर संगणकीकृत काउंटर उभारले आहेत. राम मंदिर ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात अतिरिक्त दानपेट्या ठेवल्या जात आहेत. राम मंदिर परिसरात लवकरच एक मोठा आणि सुसज्ज मतमोजणी कक्ष बांधण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे.
सोने-चांदी सरकारकडे सुपूर्द
राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार,रामलल्ला मंदिराला भेटवस्तू म्हणून मिळालेले सोने, चांदी आणि इतर मौल्यवान साहित्य वितळण्यासाठी आणि देखभालीसाठी भारत सरकारकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टने देणग्यांबाबत SBI सोबत सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करारानुसार, भारतीय स्टेट बँक (SBI) योगदान, देणग्या, धनादेश, ड्राफ्ट आणि चेक गोळा करणे, त्यांचे संकलन सुनिश्चित करणे आणि नंतर बँकेत जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी घेईल. SBI ने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासह त्यांचे परिचालन क्रियाकलाप सुरू केले आहेत.
22 जानेवारीला अगदी थाटामाटात अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा संपन्न झाला. देशभरात या सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढलं आहे. दरवर्षी अयोध्येत 5 कोटी पर्यटक येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: